Ami Je Tomar 3.0- Madhuri Dixit And Vidya Balan Dance : ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाचा पहिला भाग २००७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये विद्या बालन आणि अक्षय कुमारच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाला प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. यामधलं ‘अमी जे तोमार’ ( मेरे ढोलना सुन…) हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्यामुळेच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा दुसरा भाग आणताना सुद्धा मेकर्सनी ‘अमी जे तोमार’चं २.० व्हर्जन रिलीज केलं. आता लवकरच ‘भुल भुलैय्या’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि यात सर्वांना विद्या बालन आणि माधुरी दीक्षितचा आयकॉनिक डान्स फेस ऑफ पाहायला मिळणार आहे.

माधुरी दीक्षित आणि विद्या बालन एकाच फ्रेममध्ये डान्स करणार ही सर्वांसाठीच अत्यंत खास आणि आनंदाची बातमी होती. अखेर प्रतीक्षा संपली अन् ‘भुल भुलैय्या’च्या तिसऱ्या भागातील ‘अमी जे तोमार ३.०’ ( Ami Je Tomar ) गाणं प्रदर्शित करण्यात आलं. चित्रपटात या दोघी डान्स फेस ऑफ दरम्यान एकमेकींना टक्कर देताना दिसणार आहेत.

हेही वाचा : पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्यावर भेटीला पोहोचला प्रथमेश परब! नवीन जोडप्यासह शेअर केला फोटो; म्हणाला, “मेरे भाई…”

माधुरी दीक्षित अन् विद्या बालनचा जबरदस्त डान्स

‘अमी जे तोमार ३.०’ हे ( Ami Je Tomar ) गाणं श्रेया घोषालच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. यापूर्वीच्या दोन गाण्यांना देखील तिनेच आवाज दिला आहे. अमाल मलिक या गाण्याचा कंपोझर असून समीर यांनी हे गाणं लिहिलं आहे. माधुरी दीक्षित अन् विद्या बालन ‘अमी जे तोमार ३.०’ गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन, कमाल अदा आणि दमदार एनर्जीसह थिरकताना दिसत आहेत. याची कोरिओग्राफी चिन्नी प्रकाश यांनी केली आहे.

९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या माधुरीने या गाण्यातही आपली विशेष छाप पाडली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी जबरदस्त डान्स फेस ऑफ करून धकधक गर्लने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचा अप्रतिम डान्स, प्रत्येक स्टेप्स, चेहऱ्यावरचं मंत्रमुग्ध करणार हास्य आणि एकंदर सांगायचं झालं तर, माधुरीने डान्स करताना तिची ग्रेस पुरेपूर जपली आहे. यामुळे नेटकरी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : बिग बॉस १६ फेम अभिनेत्री ‘हाऊसफुल ५’ मध्ये साकारणार मुख्य भूमिका; डेंटिस्ट असून केली पान मसाल्याची जाहिरात, ट्रोलिंगबद्दल म्हणाली…

दरम्यान, या ( Ami Je Tomar ) आयकॉनिक गाण्याला अवघ्या १२ तासांमध्ये ५९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. याशिवाय हे गाणं युट्यूबवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.