जगभरात आमिर खानचे लाखो चाहते आहेत. त्याला बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. वर्षभरात एखादा चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांच्या मनावर आमिर खानने आधिराज्य गाजवले आहे. परंतु गेल्या काही वर्षात रिलीज झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर साजेशी कामगिरी न केल्यामुळे आमिर खाने यानंतर बॉलीवूडपासून काही काळ ब्रेक घेतला.
हेही वाचा : “शाहरुख-सलमानच्या चित्रपटांमधून नकारात्मक…” ‘शार्क टँक इंडिया फेम’ परीक्षकाचे बॉलीवूडबद्दल परखड मत!
दरम्यान, आता आमिर खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ मध्ये आमिर खानचा ‘गजनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संजय सिंघानिया आणि कल्पनाच्या प्रेमकहाणीचा शेवट आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. संजय सिंघानियाचे पात्र आमिर खान, तर कल्पनाची भूमिका असीनने साकारली होती. गजनी चित्रपटाने तेव्हा सर्व रेकॉर्ड मोडून काढत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. आमिरच्या या गाजलेल्या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल बनवण्यात येणार आहे. या संदर्भात आमिरने अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची भेटसुद्धा घेतली आहे.
हेही वाचा : रणबीर आणि रणवीरच्या बॉलीवूड पदार्पणानंतर घाबरला होता आयुष्मान, म्हणाला…
आमिर खान गेल्या आठवड्यात अल्लू अरविंद यांना भेटला होता. त्यांचे अनेक प्रोजेक्टबाबत बोलणे झाले असून निर्माते अल्लू अरविंद यांनी गजनी-२ अर्थात गजनीच्या सिक्वेलसंदर्भात आमिर खानसोबत एक कल्पना शेअर केली आहे. दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांमध्ये स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचे बोलले जात असले, तरी अद्याप कशाचीही पुष्टी देण्यात आलेली नाही. सध्या सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे.
‘गजनी’ चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये दिवंगत अभिनेत्री जिया खानने देखील महत्त्वाची भूमिका केली होती. आमिरला फिल्म इंडस्ट्रीमधून सध्या अनेक ऑफर्स येत आहेत आता मिस्टर परफेक्शनिस्ट कोणती स्क्रिप्ट निवडतात याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.