Amitabh Bachchan Abhishek Bachchan Property : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन दोघेही सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. या दोघांनी मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. बच्चन कुटुंबाची ही आलिशान मालमत्ता ओबेरॉय रिॲलिटी प्रोजेक्टमध्ये आहे. यात 3 बीएचके आणि 4 बीएचके अपार्टमेंट आहेत. त्यांनी अशी एकूण १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अभिषेक बच्चन त्याची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघेही वेगळे राहत असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान, आता अभिषेकने वडिलांबरोबर मुंबईतील मुलुंड परिसरात नवीन आलिशान अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. या मालमत्तेची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे. स्क्वेअर यार्ड्सच्या वृत्तानुसार, अभिषेक व अमिताभ यांनी मुंबईत आतापर्यंत जवळपास २१९ कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे.

हेही वाचा – तोच कल्ला अन् तोच थरार! Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”

स्क्वेअर यार्ड्सवरील नोंदणी दस्तऐवजानुसार, अमिताभ व अभिषेक यांनी ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये १० अपार्टमेंट्स खरेदी केली आहेत. यापैकी ८ अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ प्रत्येकी १,०४९ चौरस फूट आहे. तर, इतर दोन अपार्टमेंट्सचे क्षेत्रफळ ९१२ चौरस फूट प्रत्येकी आहेत. २५.९५ कोटी रुपयांत त्यांनी १०,२१६ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता खरेदी केली आहे.

अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – Video: ऐश्वर्या रायशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान वैतागलेला अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हणाला…

अभिषेक बच्चनने घेतले ६ अपार्टमेंट

१० अपार्टमेंटपैकी सहा अभिषेक बच्चनने विकत घेतली आहेत. अभिषेकने यासाठी १४.७७ कोटी रुपये मोजले आहेत. तर इतर चार अपार्टमेंट्स अमिताभ बच्चन यांनी खरेदी केली आहेत. या अपार्टमेंट्सची किंमत १०.१८ कोटी रुपये आहे. यासाठी अमिताभ व अभिषेक यांनी १.५० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले आहेत.

हेही वाचा – ‘धर्मवीर २’ OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेले फ्लॅट

अभिषेकने काही महिन्यांपूर्वी जलसा बंगल्याजवळ मालमत्ता खरेदी केली. त्यापूर्वी अभिषेक बच्चनने बोरिवलीत एकूण सहा नवे फ्लॅट्स विकत घेतले होते. त्याने ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये सहा फ्लॅट्स घेतले. यासाठी अभिषेकने तब्बल १५.४१ कोटी रुपये मोजले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan abhishek bachchan bought 10 apartments for 25 crore in mulund hrc