बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस. आजही या नावाची क्रेझ कायम आहे आणि दिवसागणिक ती वाढतच आहे. तरुण कलाकारांही लाजवेल असा अमिताभ बच्चन यांचा उत्साह त्यांच्या प्रत्येक कामातून दिसून येतो. ८० च्या दशकात याच महानायकाचा ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात आणि त्यातून त्यांचं सुखरूप बाहेर येणं याबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. पण इतकंच नव्हे तर ‘कुली’नंतर आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमिताभ यांचा जीव धोक्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मर्द’ चित्रपटाच्या सेटवर बिग बी यांच्याबरोबर असाच एक किस्सा घडल्याचं दिग्दर्शक टीनू आनंद यांनी सांगितलं आहे. टीनू आनंद आणि अमिताभ बच्चन यांनी बरेच चित्रपट एकत्र केले आहेत. अभिनयाबरोबरच टीनू आनंद यांनी अमिताभ बच्चन यांचे बरेच चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या जोडीचा ‘शेहेनशाह’ हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना एक गंभीर आजार झाला होता. टीनू आनंद यांनीच याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

आणखी वाचा : “श्रीदेवी यांना १० ऑस्कर मिळाले असते, पण…” आदिल हुसेन यांचा मोठा खुलासा

‘रेडियो नशा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये टीनू आनंद यांनी हा किस्सा सांगितला होता. ‘मर्द’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान टीनू आनंद जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा बिग बी यांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर महिती दिली. त्यावेळी मैसूरमध्ये बिग बी यांच्याबरोबर ही घटना घडल्याने त्यांना बेंगलोरमध्ये नेण्यात आलं होतं. त्यावेळी अमिताभ टीनू आनंद यांच्या ‘शेहेनशाह’ चित्रपटावरही काम करत होते. टीनू यांना त्या चित्रपटाचं चित्रीकरण कॅन्सल करायची विनंतीही केली.

अमिताभ यांनी टीनू आनंद यांना सांगितलं की त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा आजार आहे, मर्दच्या चित्रीकरणादरम्यान मध्ये ब्रेक घेऊन अमिताभ बच्चन पाणी पित होते, पण ते पाणी त्यांच्या घशाखाली न उतरता अडकले अन् अमिताभ यांच्या मेंदूला याबद्दल काहीच सिग्नल न मिळाल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि थोड्यावेळाने श्वास घेणं बंद झालं. त्यावेळी त्यांचा जीव धोक्यात आला होता.

आणखी वाचा : स्वतः निर्माती असूनही तापसी पन्नू करणार नाही ‘धक धक’ चित्रपटाचं प्रमोशन; म्हणाली “मला नकारात्मकता…”

या घटनेनंतर जेव्हा अमिताभ यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. इतकंच नव्हे तर अमिताभ पुन्हा अभिनय करू शकणार नाहीत असंही त्यावेळी सांगण्यात आलं होतं. यामुळे अमिताभ यांना ब्रेक घ्यावा लागला, पण आपला दिलेला शब्द बिग बी यांनी पाळला अन् टीनू आनंद यांच्या ‘शेहेनशाह’चं चित्रीकरण पूर्ण केलं व तो त्यांच्या जीवनातील एक सर्वात गाजलेला अन् महत्त्वाचा चित्रपट ठरला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan almost died on the sets of mard director tinnu anand shares the memory avn