Amitabh And Jaya Bachchan Wedding Card : मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून अमिताभ व जया बच्चन यांच्याकडे पाहिलं जातं. या दोघांचा विवाहसोहळा ३ जून १९७३ रोजी पार पडला होता. दोघांच्या लग्नाला फक्त जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती. खरंतर, अमिताभ आणि जया यांचं लग्न खूपच घाईघाईत झालं होतं. जया यांच्याशी लग्न केलं तरच लंडनला जाण्याची परवानगी दिली जाईल अशी अट ‘बिग बीं’चे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांना घातली होती.
‘कौन बनेगा करोडपती १६’ च्या नुकत्याच एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला. यावेळी मंचावर विशेष पाहुणे म्हणून आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान हे दोघंही उपस्थित होते. यादरम्यान आमिरने ‘बिग बी’ व जया बच्चन यांची लग्नपत्रिका सर्व प्रेक्षकांना दाखवली. याचा प्रोमो सोनी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सध्या सर्वत्र प्रचंड व व्हायरल होत आहे.
आमिर खान ‘बिग बीं’ना विचारतो, “तुम्हाला तुमच्या लग्नाची तारीख आठवतेय का?” यावर अमिताभ बच्चन “३ जून १९७३” असं उत्तर देतात. यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आणखी एक गुगली टाकतो आणि म्हणतो, “आता याचा काहीतरी पुरावा द्या आम्हाला… कारण, माझ्याकडे तुमची लग्नपत्रिका आहे. तुमचा मी नंबर वन फॅन आहे आणि हा त्याचाच एक पुरावा आहे.” हे ऐकल्यावर अमिताभ बच्चन हसु लागतात.
आमिरने दाखवलेल्या अमिताभ व जया ( Amitabh And Jaya Bachchan ) यांच्या लग्नपत्रिकेवर लिहिलेला “जब तें रामु ब्याहि घर आए । नित नव मंगल मोद बधाए” हा श्लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. या दोघांचा लग्नसोहळा मुंबईत जुहूमध्ये पार पडला होता. पत्रिकेवर एका बाजूला हिंदी तर, दुसऱ्या बाजूला इंग्रजी मजकूर लिहिण्यात आला आहे. सध्या ५१ वर्षांपूर्वीची अमिताभ यांची ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : …म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा
अमिताभ बच्चन यांची लग्नपत्रिका
अभिनेता आमिर खान ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये सहभागी झाल्याचा विशेष भाग ११ ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. त्यामुळे या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना अनेक जुने किस्से ( Amitabh And Jaya Bachchan ) याशिवाय इंडस्ट्रीत अनेक वर्षे काम केलेल्या या प्रतिष्ठित कलाकारांची अनोखी जुगलबंदी अनुभवता येईल. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.