महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी हिंदी सिनेसृष्टीत जवळपास पाच दशक गाजवली आहेत. अजूनही त्यांचा जलवा कायम आहे. सध्या ‘कौन बनैगा करोडपती’चा १६ पर्व अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. अशातच बिग बी यांनी एका मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे माफी मागितली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून मराठी कलाकारांसह नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सगळ्यांना नमस्कार करत आपल्या छातीवर ठेऊन अमिताभ बच्चन म्हणाले होते की, मी कचरा करणार नाही. हे मराठीमध्ये अमिताभ बच्चन बोलले होते. पण यावेळी अमिताभ बच्चन यांच्यातून एक शब्द उच्चारताना चूक झाली. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा व्हिडीओ करत आपली ही चूक मान्य केली आणि माफी मागितली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य

हेही वाचा – Video: अंकिता, पंढरीनाथने निक्कीची केली हुबेहूब नक्कल, ‘बी’ टीममध्ये रंगली निक्कीच्या चालण्यावरून चर्चा

नुकताच अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, नमस्कार मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी व्हिडीओ केला होता की, मी कचरा करणार नाही. ते मी मराठीमध्ये म्हटलं होतं. मी ‘कचरा’ या शब्दाचा उच्चार चुकीचा केला होता. माझा मित्र सुदेश भोसलेने सांगितलं, तुम्ही कचरा शब्दाचा उच्चार चुकीचा केला आहे. तर मी हा परत व्हिडीओ करतो आणि म्हणतो, मी कचरा करणार नाही. धन्यवाद.

हा व्हिडीओ शेअर करत अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी माफी मागितली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “एका व्हिडीओमध्ये चुकीचा उच्चार केला होता. म्हणून दुरुस्त केलं आहे. क्षमस्व”

हेही वाचा – Video: दाक्षिणात्य सुपरस्टार हात मिळवण्यासाठी पुढे आला पण आराध्याने…; ऐश्वर्या राय-बच्चनच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

मराठी कलाकार काय म्हणाले?

अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांचा हा व्हिडीओ पाहून मराठी कलाकार मंडळींसह नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत. अभिनेत्री समिरा गुजर-जोशी म्हणाली की, चूक मान्य करायला खूप मोठं काळीज लागतं…तुमच्याकडून प्रत्येक वेळी नवीन काही शिकायला मिळतं. तुम्ही मराठी साहित्य आवडीने वाचता ही फार छान गोष्ट आहे. तर अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाली, “म्हणून ‘च’ तुम्ही ग्रेट आहात सर.” तसंच अभिजीत खांडकेकर, ऋजुता देशमुख, नम्रता गायकवाड अशा अनेक कलाकारांनी अमिताभ बच्चन यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Comments On Amitabh Bachchan Video

दरम्यान, अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा २७ जूनला ‘कल्कि २८९८ एडी’ (Kalki 2898 AD) चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली होती. अमिताभ बच्चन यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. आता बिग बी ‘कल्कि २८९८ एडी’ चित्रपटाच्या पुढच्या भागात देखील झळकणार आहेत. ‘कल्कि’ व्यतिरिक्त अमिताभ रजनीकांत यांच्यासह ‘वेट्टैयन’ चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader