महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाच दशकांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या काळात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. बिग बींनी कधीकाळी त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून अवघे ५०० रुपये मिळाले होते. पण आता ते देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याजवळ मुंबईत आलिशान बंगले, अनेक गाड्या आणि तब्बल ३ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ६० कोटी रुपये आहे. Caknowledge च्या अहवालानुसार, बिग बींची एकूण संपत्ती सुमारे ३१९० कोटी रुपये आहे. तसेच ते एका चित्रपटासाठी ६ कोटी रुपये आणि ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे ५ कोटी रुपये मानधन घेतात. याशिवाय त्यांच्याकडे लक्झरी कार्स आहेत. यामध्ये ३ कोटी रुपयांची रेंज रोव्हर, पोर्श केमन एस, मिनी कूपर एस, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, मर्सिडीज-बेंझ एस 3450, लेक्सस एलएक्स 570 आणि इतर कार्सचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, त्यांच्याजवळ २६० कोटी रुपयांचे खासगी जेट देखील आहे.
हेही वाचा – अभिषेकने ‘असं’ दिलं वडील अमिताभ यांना वाढदिवसाचं सरप्राईज, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
बिग बींचे मुंबईत जलसा, जनक, प्रतीक्षा व वत्स नावाचे चार बंगले आहेत. पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांच्यासह ते जलसा बंगल्यात राहतात. याशिवाय त्यांचे मुंबईच्या जनक भागात एक कार्यालय आहे आणि अलाहाबादमध्ये एक वडिलोपार्जित घर आहे. त्या घराचे शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.