२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. या प्रतिष्ठापना सोहळ्याला देशभरातील दिग्गज राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील मंडळी आणि मनोरंजन इंडस्ट्रीतील कलाकारही सहभागी होणार आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. याच दरम्यान, बिग बींनी अयोध्येत एक भूखंड (प्लॉट) खरेदी केला आहे. ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या माध्यमातून त्यांनी हा भूखंड घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन यांचा भूखंड ‘सेव्हन स्टार मल्टीपर्पज एन्क्लेव्ह – द सरयू’मध्ये आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, सूत्रांनी या भूखंडाची किंमत १४.५ कोटी रुपये असल्याचं सांगितलंय. तसेच त्याचा आकार १० हजार स्क्वेअर फूट आहे. २२ जानेवारी रोजी ५१ एकरात पसरलेल्या सरयूचे उद्घाटन होणार आहे, त्याच दिवशी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा होणार आहे. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

“धार्मिक विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला, कुणी शुद्राने…”, किरण मानेंनी राम मंदिर उद्घाटनाबद्दल केलेली पोस्ट चर्चेत

‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले, “माझ्या हृदयात अयोध्या शहरासाठी विशेष स्थान आहे. ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्यासह ‘द सरयू’मध्ये घर बांधण्यासाठी मी उत्सुक आहे. अयोध्येतील अध्यात्म आणि सांस्कृतिक समृद्धीने भौगोलिक सीमा ओलांडून एक भावनिक बंध निर्माण केला आहे. अयोध्येत परंपरा आणि आधुनिकता दोन्ही आहे. मी या जागतिक आध्यात्मिक राजधानीत माझे घर बांधण्यास उत्सुक आहे.”

अगस्त्य नंदा आजोबा अमिताभ बच्चन यांचा नाही तर ‘या’ अभिनेत्याचा आहे मोठा चाहता; म्हणाला, “आमची पिढी…”

‘एचओएबीएल’ चे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की राम मंदिरापासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर आणि अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सरयूचे पहिले नागरिक म्हणून अमिताभ बच्चन यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी भूखंड घेतलाय, त्या प्रकल्पाचे काम मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

मागच्या काही वर्षांपासून अयोध्येत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास होत आहे. इथे राम मंदिर उभारण्याची घोषणा झाली तेव्हापासून अयोध्येत जमिनीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. तसेच लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करत आहेत. एका आठवड्याने २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan bought plot in ayodhya the sarayu before ram mandir inauguration hrc