बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे साडू म्हणजेच जया बच्चन यांच्या बहिणीचे पतीदेखील अभिनेते आहेत. अभिनेत्री जया बच्चन यांची बहीण रीता भादुरी यांनाही थिएटर आणि कलाविश्वाची खूप आवड होती, पण त्यांनी यात करिअर केलं नाही. पण त्यांनी एका अभिनेत्याशी लग्न केलं. बच्चन कुटुंबातील अनेक सदस्यांना तुम्ही ओळखत असाल. पण आज आम्‍ही तुम्‍हाला अमिताभ बच्‍चन यांच्‍या साडूबद्दल सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदीविरोधातील खटला; शैलेश लोढांना मिळेल कोट्यवधींची थकबाकी, म्हणाले, “ही लढाई…”

जया बच्चन यांची बहीण रीता भादुरी लग्नानंतर रीता वर्मा झाल्या. त्यांच्या पतीचे नाव राजीव वर्मा आहे. राजीव वर्मा हे हिंदी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. राजीव यांनी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. राजीव यांनी ‘हम साथ साथ हैं’मध्ये तब्बूच्या वडिलांची भूमिकाही साकारली आहे. अमिताभ बच्चन आणि राजीव वर्मा ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘आरक्षण’ या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. पण राजीव व जया बच्चन यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. याबद्दल न्यूज १८ ने वृत्त दिलं आहे.

“आम्ही वसुलीसाठी कधीही…”, नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एडलवाईस कंपनीचे स्पष्टीकरण

होशंगाबादचे रहिवासी असलेले राजीव वर्मा यांनी भोपाळमध्ये थिएटर केले आणि याच दरम्यान त्यांची व रीताची भेट झाली. दोघांना प्रेम झालं आणि तीन वर्षांच्या अफेअरनंतर रीता आणि राजीव यांनी १९७६ मध्ये लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव वर्मा हे पेशाने आर्किटेक्ट होते व नंतर अभिनेते झाले. तर रीता या सेंट्रल स्कूलमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका झाल्या. रिटा आणि राजीव यांना दोन मुलं आहेत.

राजीव वर्मा ‘हम दिल दे चुके सनम’, ‘कोई मिल गया’, ‘कच्चे धागे’, ‘हिम्मतवाला’, ‘चलते चलते’ आणि ‘क्या कहना’ यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले आहेत. रीटा आणि राजीव हे ‘भोपाळ थिएटर्स’ आणि हॉटेल सरल ग्रुपचे मालक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan brother in law rajeev verma is actor worked in maine pyar kiya jaya bachchan sister rita varma hrc