बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार एकमेकांचे नातेवाईक आहेत. काही सेलिब्रिटींच्या कुटुंबातील सदस्य अभिनयक्षेत्रात नसले तरी त्यांचे जोडीदार या क्षेत्रात काम करतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्याही बाबतीत असंच आहे. अमिताभ बच्चन यांचे साडू म्हणजेच जया बच्चन यांच्या बहिणीचे पती लोकप्रिय अभिनेते आहेत.

अभिनेत्री जया बच्चन यांची बहीण रीता भादुरी या अभिनेत्री नाहीत. त्यांना थिएटर आणि कलाविश्वाची खूप आवड होती, पण करिअर म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडलं नाही. पण त्यांनी एका अभिनेत्याशी लग्न केलं. राजीव वर्मा असे रीता भादुरी यांच्या पतीचे नाव आहे. राजीव यांनी अनेक बॉलीवूड चित्रपट केले आहेत.

हेही वाचा – अमिताभ बच्चन-अभिषेक बच्चन यांनी मुलुंडमध्ये विकत घेतली १० अपार्टमेंट्स, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

रीता भादुरी लग्नानंतर रीता वर्मा झाल्या. त्यांचे पती राजीव वर्मा हे हिंदी अभिनेते असून त्यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका केल्या. तुम्ही ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहिला असेल, यात सलमान खानच्या वडिलांची भूमिका राजीव वर्मा यांनी साकारली होती. राजीव यांनी ‘हम साथ साथ हैं’मध्ये तब्बूच्या वडिलांची भूमिकाही केली होती.

‘मैंने प्यार किया’ मधील राजीव वर्मा व सलमान खानचा फोटो

अमिताभ बच्चन आणि राजीव वर्मा यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘बुड्ढा होगा तेरा बाप’ आणि ‘आरक्षण’ या चित्रपटांमध्ये दोघांनी स्क्रीन शेअर केली. मात्र राजीव वर्मा व जया बच्चन यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. याबद्दल न्यूज १८ ने वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – तोच कल्ला अन् तोच थरार! Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”

राजीव वर्मा व रीता भादुरी यांची भेट

राजीव वर्मा मूळचे मध्य प्रदेशमधील होशंगाबादचे आहेत. त्यांनी भोपाळमध्ये थिएटर केले आणि याच दरम्यान त्यांची व रीताची भेट झाली. दोघे प्रेमात पडले आणि तीन वर्षांच्या अफेअरनंतर रीता व राजीव यांनी १९७६ मध्ये लग्नगाठ बांधली. राजीव वर्मा हे आर्किटेक्ट होते व नंतर अभिनेते झाले. तर रीता या सेंट्रल स्कूलमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. या दोघांना दोन मुलं आहेत.

राजीव वर्मा, अमिताभ बच्चन, जया बच्चन एकाच फ्रेममध्ये (फोटो – सोशल मीडिया)

हेही वाचा – Video: ऐश्वर्या रायशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान वैतागलेला अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर हात जोडून म्हणाला…

राजीव वर्मा यांच्या इतर काही चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’, ‘कोई मिल गया’, ‘कच्चे धागे’, ‘हिम्मतवाला’, ‘चलते चलते’ आणि ‘क्या कहना’ यासह अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या. रीता आणि राजीव हे ‘भोपाळ थिएटर्स’ आणि हॉटेल सरल ग्रुपचे मालक आहेत.