बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या चित्रपटांमुळे,कधी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या होणाऱ्या फोटो किंवा व्हिडीओमुळे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे हे कलाकार चर्चेत असतात. आता बॉलीवू़डमधील महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) होय. त्यांनी आपल्या चाहत्यांचे आपल्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

२ ऑगस्ट हा अमिताभ बच्चन यांचा दुसरा जन्म मानला जातो. कारण- या दिवशी त्यांचा एका अपघातातून जीव वाचला होता. १९८२ ला जेव्हा ‘कुली’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी सेटवर त्यांचा अपघात झाला होता. हा अपघात इतका गंभीर होता की, त्यांचा जीव धोक्यात होता. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्यांना जीवनदान मिळाले होते. त्यावेळपासून २ ऑगस्ट हा बीग बी यांचा दुसरा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९८२ ला झाला होता. शनिवारी बीग बींनी शुभेच्छा दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

“२ ऑगस्टला दिलेल्या तुम्ही शुभेच्छा आणि आशिर्वादाबद्दल मनापासून धन्यवाद आणि खूप प्रेम. मी सगळ्यांना वैयक्तिकरित्या मेसेज करू शकत नाही. त्यामुळे माझ्या अशा प्रतिसादाचा स्वीकार करा. मला जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळी मी प्रयत्न करेन.”असे अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानताना म्हटले आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi: वर्षा उसगांवकरांनी ‘मूर्ख मित्रा’चं लॉकेट दिलं ‘या’ स्पर्धकाला, म्हणाल्या, ‘माझं खच्चीकरण…”

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कंमेट करत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आपुलकी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, तुमच्या अशा शब्दांमुळे आमचा दिवस चांगला जातो. तुमचा दयाळूपणा आणि प्रेमळ शब्द आमच्यासाठी प्रेरणा आहेत. दुसऱ्या एका चाहत्याने २ ऑगस्टची आठवण सांगताना म्हटले आहे की,”आम्ही २ ऑगस्ट हा दिवस कधीही विसरु शकत नाही. आमच्या सगळ्यांसाठी कठीण दिवस होता. त्यावेळी तुमच्या आरोग्याविषयी माहिती देण्यासाठी इंटरनेट नव्हते. संपूर्ण कुटुंबाने तुमच्यासाठी उपवास केला होता. त्या प्रार्थनांमध्ये खूप मोठी ताकद होती. ज्या चित्रपटाने तुमची संपूर्ण जगच बदलले, तो ‘कुली’ चित्रपट पाहण्याची माझ्यात हिम्मत नाही. असे एका चाहत्याने म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ते नुकतेच नाग अश्विन यांच्या ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून आले आहेत. अश्वत्थामा या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून मोठे कौतुक झाले. त्यांच्याशिवाय या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर, सलमान दुलकिर, दिशा पटाणी या दिग्गज कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित होऊन या चित्रपटाला महिना पूर्ण झाल्यानंतरही हा सिनेमा चित्रपटगृहात टिकून आहे.