अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबरला त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चित्रपट जगतात काहीच ओळख नसताना, कोणताही गॉडफादर नसताना फक्त आपल्या अभिनयाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यांनी बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. पण बिग बींचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अनेक संकटांचा सामना करून स्वतःला खऱ्या अर्थाने शहेनशहा करून दाखवलंय. या सगळ्यात इंडस्ट्रीतील काही जिवलग माणसांची त्यांना साथ मिळाली. आज आपण अमिताभ बच्चन यांचा असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात….

किस्सा आहे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचा. या चित्रपटासाठी नायकाचा शोध सुरू होता. मुळात हा चित्रपट कॉमेडीच होता आणि त्यांत मेहमूद असणार होते. मेहमूद यांनी अमिताभ बच्चन यांचे काम पहिले होते आणि मेहमूद हे नेहमी स्ट्रगलर्सच्या मागे उभे राहायचे त्यामुळे त्यांनी त्यांचे भाऊ अन्वर अली आणि अमिताभ बच्चन यांना चित्रपटात घेतले, बस मधला तो विनोदी प्रवास हिट ठरेल याची मेहमूद यांना खात्रीच होती. पुढे काय घडलं होतं? पाहा व्हिडीओ

गोष्ट पडद्यामागची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan could not dance in bombay to goa cinema what happens next check video hrc