Amitabh Bachchan Post : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फेसबूक, इन्स्टाग्राम व एक्स अकाउंटवरून पोस्ट करत असतात. काही वेळा त्यांच्या पोस्ट मोजक्याच शब्दांच्या असतात. बरेचदा त्यांच्या क्रिप्टिक पोस्ट पाहून चाहते गोंधळतात. अशीच एक पोस्ट त्यांनी आता केली आहे.
अमिताभ बच्चन मागील अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो होस्ट करतात. या शोचे १६ वे पर्व काही दिवसांपूर्वीच संपले. हा शो सुरू असताना अनेकदा बिग बी शूटिंग संदर्भात पोस्ट करायचे. एकदा तर त्यांनी “आता जायची वेळ झाली,” अशी पोस्ट केली होती. त्यामुळे त्यांचे चाहते काळजीत पडले होते. आता त्यांनी काहीशी तशीच पोस्ट केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट फक्त चार शब्दांची आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जे लिहिलंय ते पाहून चाहते गोंधळले आहेत. “मी जातोय, चला” (जा रहे हैं, चलो) अशी पोस्ट त्यांनी केली आहे. ही मोजक्याच शब्दांची पोस्ट अमिताभ यांनी नेमकी कशासंदर्भात केली आहे, हे चाहत्यांनाही समजलेलं नाही. त्यामुळे त्यांनी या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
पाहा पोस्ट –

“कौन बनेगा करोडपतीच्या सुरुवातीसाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही सेटवर येताय का? उत्साही लोक नेहमी इतरांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्यासाठी तयार असतात. तुमचे स्वागत आहे,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तुम्ही कुठे जाताय सर? तुम्ही ठिक आहात अशी आशा आहे, असं एका युजरने म्हटलं आहे. “सर तुम्ही असं बोलायला नको, मी येतो असं म्हणा,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर ही पोस्ट वाचून मला धक्का बसलाय, तुम्ही बरे आहात अशी आशा आहे, असं एका युजरने लिहिलं.



दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते शेवटचे ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसले होते. यात त्यांनी अश्वत्थामा ही भूमिका केली होती. या चित्रपटात प्रभास व दिशा पाटनीसह अनेक कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.