Amitabh Bachchan Did Mohabbatein In 1 Rupee : बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे बॉक्स ऑफिसवर जोरदार हिट झालेत. ९० च्या दशकात आलेला ‘मोहब्बतें’ चित्रपट आजही अनेक प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या चित्रपटाची कथा आणि सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय यांमुळे लाखो चाहत्यांना आजही हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी नारायण शंकर हे पात्र साकारलं होतं. पण, तुम्हाला माहितीये का? या चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी फक्त एक रुपया इतकच मानधन घेतलं होतं.

चित्रपट निर्माते निखिल अडवाणी यांनी नुकतीच ‘रेडिओ मिर्ची’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिनेविश्वातील सध्याचं वातावरण आणि आधीचं वातावरण यात नेमका कसा फरक आहे, यावर वक्तव्य केलं आहे. तसेच या दोन काळांमधील फरक सांगताना त्यांनी अमिताभ बच्चन यांचं एक उदाहरणसुद्धा दिलं आहे.

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
isha kopikar not selected for don 2 movie
शाहरुख खानच्या सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा केलेला पत्ता कट; दु:ख व्यक्त करत म्हणाली, “मी निर्मात्यांना फोन…”
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Harbhajan Singh has said that he does not talk to MS Dhoni
Harbhajan Singh : ‘मी १० वर्षांपासून धोनीशी बोलत नाही…’, हरभजन सिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘मी सीएसकेत असताना…’
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
chunky pandey was called to attend funeral
पैसे देऊन अंत्यसंस्काराला बोलावलं, रडल्यास मानधन वाढवून देण्याची कुटुंबाची ऑफर अन्…; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा

हेही वाचा : Video : “पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली…”, आदित्यच्या बोलण्याने दुखावली पारू; नेमकं घडलं काय? पाहा प्रोमो

मुलाखतीमध्ये निखिल अडवाणी यांना सिनेसृष्टीतील आधीचा काळ आणि आताचा काळ कसा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आधीच्या व्यक्तींमध्ये प्रेम आणि माया होती. त्या काळी चित्रपट नात्यातील विश्वास आणि ताकद यांच्या आधारे बनवले जात होते.

निखिल यांच्याकडून अमिताभ बच्चन यांच्या किश्शाचं कथन

यावेळी निखिल अडवाणी यांनी अमिताभ बच्चन यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “माझ्या सिनेविश्वातील कारकि‍र्दीच्या काळात मी, सुरुवातीला ‘यशराज फिल्म्स’बरोबर काम करत होतो. त्यावेळी अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा यांनी सिलसिला या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. त्यावेळी मानधन म्हणून तुला किती पैसे हवेत, असं त्यांनी विचारलं. त्यावेळी अमिताभ यांनी मला एक घर खरेदी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मला चांगली रक्कम द्या, असं अमिताभ बच्चन यांनी यश चोप्रा यांना सांगितलं.”

निखिल अडवाणी यांनी पुढे सांगितलं, “काही वर्षांनी यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना ‘मोहब्बतें’साठी विचारलं. तसेच यावेळी पैसे किती घेणार हेदेखील विचारलं. मात्र, घर घेताना मागितली तेवढी रक्कम दिल्यानं आता मी फक्त एक रुपया घेणार, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं.”

हेही वाचा :शाहरुख खानच्या सिनेमातून मराठमोळ्या अभिनेत्रीचा केलेला पत्ता कट; दु:ख व्यक्त करत म्हणाली, “मी निर्मात्यांना फोन…”

“आधी चित्रपट पैशांवर नाही, तर लोकांच्या मनावर आणि नात्यांच्या मजबुतीवर टिकून असायचे. आजकाल सर्व काही पैशांवर ठरतं. आधी पैसे ठरतात आणि मग कोण काम करणार आणि कोण नाही हे ठरतं,” असंही निखिल अडवाणी म्हणाले. तसेच त्यांनी पुढे ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ या चित्रपटांची आठवणही सांगितली. पाम आंटी (पामेला चोपडा) नेहमी आम्हाला जेवण बनवून द्यायच्या. त्या प्रत्येकाची आवड-निवड विचारायच्या. ‘दिलवाले दुल्हनियां’ व ‘मोहब्बतें’ हे चित्रपट अशाच पद्धतीने बनले आहेत”, असंही निखिल अडवाणी म्हणाले.

Story img Loader