सोशल माडियावर सध्या पाकिस्तानी मुलगी आयेशा बरीच चर्चेत आहे. ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर तिने केलेला डान्स व्हायरल झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर अनेकांनी तिच्या डान्स स्टेप फॉलो करत रिल्स शेअर केले. एवढंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता अभिनेते अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांच्या एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यात अमिताभ बच्चन ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या असून त्याची बरीच चर्चा आहे.

आणखी वाचा-Video: ‘मेरा दिल ये पुकारे…’ ट्रेंडच्या नादात माधुरी दीक्षितने केली पाकिस्तानी मुलीची कॉपी, नेटकरी संतापले

अमिताभ बच्चन यांच्या डान्सचा हा व्हिडीओ खरं तर ‘सूर्यवंशम’ चित्रपटातील आहे. ज्यात त्यांनी भानु प्रताप सिंह ही भूमिका साकारली होती. या ते कुटुंबाबरोबर एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणं टाकून त्याला मजेदार ट्विस्ट देण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून अमिताभ बच्चन यांचे चाहते खूपच खुश आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ १३ लाख २१ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

आणखी वाचा-“शिनचान की बहन लग रही हैं…”; रश्मिका मंदाना ‘ओव्हर अ‍ॅक्टिंग’च्या त्या व्हिडीओमुळे होतेय प्रचंड ट्रोल

दरम्यान ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणं १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात वैजयंती माला आणि प्रदीप कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं होतं. अनेक वर्षांनंतर याच गाण्यावर आयेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे गाणं आता पुन्हा एकदा ट्रेंड होताना दिसत आहे.