अमिताभ बच्चन यांचा नातू आणि ‘द आर्चीज’ फेम अभिनेता अगस्त्य नंदा याने ‘कौन बनेगा करोडपती १५’ मध्ये हजेरी लावली. अगस्त्यबरोबर सुहाना खान, खुशी कपूर, वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती आणि युवराज मेंदा आणि चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरदेखील शोमध्ये आले होते. या एपिसोड दरम्यान अमिताभ जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. त्यांची मुलगी श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्यला त्याच्या जन्माच्या पाच मिनिटांनंतर पहिल्यांदा आपल्या हातात धरलं होतं, असं ते सांगतात.
एपिसोडचा एक प्रोमो नुकताच सोनी टीव्हीने शेअर केला होता ज्यात अगस्त्याने त्याच्या ‘नानू’ला (आजोबाला) सोपे प्रश्न विचारा अशी विनंती केली होती. ही विनंती त्याने काव्यमय पद्धतीने केली. अगस्त्य व्हिडीओमध्ये म्हणतो, “नानू आप ओजी, नानू आप महान, केबीसी के सावल देदो आप आसान.” (नानू तुम्ही ओजी आहात, नानू तुम्ही महान आहात, आम्हाला केबीसीचे सोपे प्रश्न विचारा), अशा आशयाच्या दोन ओळी तो म्हणतो. मात्र बिग बींनी त्याची विनंती मान्य करण्यास नकार दिला.
नंतर अमिताभ बच्चन यांनी अगस्त्यची ओळख करून दिली. अगस्त्य आपल्या मुलीचा मुलगा आहे, असं ते म्हणाले. “त्याच्या जन्माच्या पाच मिनिटांनंतर मी त्याला माझ्या हातात धरलं होतं. त्याला माझी दाढी बोटाने खाजवायची सवय होती. आता तो खूप मोठा झाला आणि कलाकारही झाला,” असं बिग बी म्हणाले. यावेळी ते व अगस्त्य भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”
एपिसोडमध्ये बिग बींनी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर हिची प्रेक्षकांना ओळख करून दिली. दरम्यान, ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे.