ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव यांनी बॉलीवूडच्या शेकडो चित्रपटांमध्ये काम करून या चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कठीण काळात त्यांना अंजन श्रीवास्तव यांनी मोठा आधार दिला होता. एका मुलाखतीत अंजन यांनी बोफोर्स घोटाळ्यात अडकल्यामुळे अमिताभ यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला याबाबत भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “माझ्या कुटुंबावर टीका करून काय मिळतं?” ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह कमेंट्स पाहिल्यावर करण जोहर भडकला, म्हणाला…

‘राजश्री अनप्लग्ड’ला दिलेल्या मुलाखतीत अंजन श्रीवास्तव यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह असणारी मैत्री, त्यांच्या जीवनातील कठीण काळ याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्यांनी जुने दिवस आठवत सांगितले, “मी अमितजींना भेटण्यासाठी तुफान चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो. तेव्हा कोलकाता येथे त्यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने करण्यात येत होती. अमितजींचे पोस्टर्स फाडले जात होते, या सगळ्यामुळे ते स्वत:ही निराश होते. मी सेटवर गेल्यावर त्यांना ‘भाईसाहब कैसे है?’असा प्रश्न विचारला यावर त्यांनी फक्त ‘ठीक हूं’ एवढेच उत्तर दिले.”

हेही वाचा : “भविष्यात नीना गुप्तांबरोबर पडद्यावर रोमान्स…”, सुप्रसिद्ध अभिनेत्याचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनयाबरोबरच अंजन श्रीवास्तव एक चांगले बॅंकर होते. त्यांच्या बॅंकेने अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कंपनीत गुंतवणूक केली होती. १९९० च्या काळात एबीसीएल कंपनी पूर्णपणे तोट्यात होती. याविषयी सांगताना अंजन श्रीवास्तव म्हणाले, “कंपनी तोट्यात सापडल्यावर जेव्हा मी अमिताभ यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा बच्चन साहेबांनी माझ्यासमोर हात जोडले. ‘मी शक्य तेवढ्या लवकर तुमचे पैसे परत करेन’, असे त्यांनी मला सांगितले.”

हेही वाचा : इस्लाम धर्मासाठी बॉलीवूड सोडणाऱ्या सना खानने दिला बाळाला जन्म, म्हणाली “अल्लाहने आम्हाला…”

“अमिताभ यांची एकंदर परिस्थिती पाहून मी त्यांना म्हणालो, मी पैसे परत घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो नाही. तुम्हाला शक्य असेल तेव्हा माझे पैसे परत करा. माझा तुमच्यावर विश्वास आहे. आम्ही इकडे तुमच्या अकाऊंटंटने केलेली एक चूक दुरुस्त करण्यासाठी आलो आहोत. पुन्हा बॅंकेत आल्यावर मी तेथील विश्वासू मंडळींना अमिताभ यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका असे सांगितले. पुढे हळूहळू त्यांनी सर्व पैसे परत केले.”, असे अंजन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

अंजन श्रीवास्तव म्हणाले, “बच्चन साहेब त्यांच्या कंपनीच्या आर्थिक कारभारामुळे त्रस्त झाले होते. त्यांच्या एबीसीएल कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु, २००० च्या दशकात ‘कौन बनेगा करोडपती’ च्या यशानंतर आणि काही सुपरहिट सिनेमांनंतर बि बी कर्जातून मुक्त झाले. मात्र, केबीसीच्या प्रचंड यशानंतर अमिताभ यांनी त्यांच्या जुन्या मित्रांशी कायमचा संपर्क तोडला याचे मला आश्चर्य वाटते.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan got up with folded hands aanjjan srivastav recalls actors tough days sva 00