कलाकारांची मुले आणि नातवंडांकडे अनेकांच्या नजरा असतात. महानायक अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे त्यांची नात नव्या नवेली नंदादेखील कायम चर्चेत असते. सध्या नव्याने शेअर केलेला एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने गुजरातमधल्या एका गावातील स्वत: ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : “जय श्री राम…” ‘आदिपुरुष’मधील पहिलं गाणं पाहून प्रेक्षक भारावले; अजय-अतुलच्या संगीताने पुन्हा केली कमाल!

Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
do you know Shrimad Bhagavad Geeta temple in pune
Pune Video : पुण्यातील सुंदर श्रीमद् भगवत गीता मंदिर पाहिले आहे का? कुठे आहे हे मंदिर, जाणून घ्या

नव्या ही ‘आरा हेल्थ’ कंपनीची सहसंस्थापक असल्याने तिने आपल्या टीमसह गुजरातमध्ये गणेशपुरा भागातील ग्रामीण महिलांची भेट घेतली. ‘आरा हेल्थ’ ही कंपनी स्त्रियांच्या आरोग्यासंदर्भात काम करते. सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणाऱ्या नव्याने या वेळी ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नव्या ट्रॅक्टर चालवताना आणि एका झाडाखाली खाटेवर बसून महिलांशी संवाद साधताना दिसत आहे. यामुळे सर्व जण सध्या तिचे कौतुक करीत आहेत. तिची आई श्वेता बच्चन, सिद्धांत चतुर्वेदी, सोनाली बेंद्रे, गजराज राव, महीप कपूरसह सर्व कलाकारांनी नव्या नवेली नंदाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची २०० कोटींच्या दिशेने वाटचाल, १५ दिवसात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

अमिताभ यांची नात शहरी लाइफस्टाइल विसरून साधेपणाने लोकांमध्ये मिळून मिसळून वागतेय हे पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. “नव्या तिच्या वडिलांचा वारसा पुढे नेईल,” अशी कमेंट एका युजरने व्हिडीओवर केली आहे. तसेच दुसर्‍या युजरने लिहिले, “तुम्ही अप्रतिम काम करत असून बच्चन आणि नंदा कुटुंबीयांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.”

हेही वाचा : “तुझ्या आयुष्यात महत्त्वाचे कोण?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत विकी कौशलने शेअर केला ‘तो’ फोटो

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. केवळ असे व्हिडीओच नाही तर तिने एक पॉडकास्टही सुरू केला होता. यामध्ये आई आणि आजीकडून तिने बच्चन कुटुंबीयांच्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या होत्या. हा पॉडकास्ट आता संपला असून याद्वारे नव्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

Story img Loader