बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा व अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याबाबत दोघांनीही बोलणं टाळलं होतं. परंतु, आता ते एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
नव्या व सिद्धांतला नुकतंच सार्वजनिक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. अमृतपाल सिंगच्या बर्थडे पार्टीसाठी नव्या व सिद्धांतने हजेरी लावली होती. यावेळी ते एकाच कारमध्ये दिसले. या दोघांनीही पार्टीसाठी ट्विनींगही केल्याचं दिसून आला. नव्याने लाल रंगाचा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. तर सिद्धांतही लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला.
हेही वाचा>> “आमचं कोकणही गेली १२ वर्षे…” समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट
हेही वाचा>>राणादा-पाठकबाईंनंतर मालिका विश्वातील अभिनेत्याची लगीनघाई, गुपचूप उरकला साखरपुडा
नव्या व सिद्धांतचा हा व्हिडीओ योगेन शाह या पापाराझी अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. पापाराझींच्या कॅमेऱ्यात हे दोघेही कैद झाले आहेत. यादरम्यान स्पॉट झाल्याचं कळताच नव्या गालातल्या गालात हसत लाजल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
अमिताभ व जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आरा हेल्थ या वेब पोर्टलची को-फाउंडर आहे. तर सिद्धांत बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. नुकताच तो ‘फोन भूत’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.