झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून अनेक नवोदित कलाकार मंडळींनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. महानायक, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर यांच्यासह अनेकांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. आता या चित्रपटातील अगस्त्यने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे.

बिग बींचा नातू अगस्त्यने काल, ११ जानेवारीला इन्स्टाग्रामवर आपलं नवं अकाउंट उघडलं आणि पहिला फोटो पोस्ट केला. या फोटोला हजाराहून लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. तसेच अवघ्या काही तासांत त्याचे हजारो फॉलोवर्स झाले आहेत. पण सातत्याने अगस्त्यचे फॉलोवर्स वाढताना दिसत आहे. अगस्त्यच्या फॅन फॉवोइंगमध्ये सर्वात आधी नाव कथित गर्लफ्रेंड सुहान खानचं दिसत आहे.

हेही वाचा – Video: ‘तू चाल पुढं’च्या सेटवरून दीपा परब घरी घेऊन गेली ‘ही’ गोष्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “अश्विनीची नवीन…”

सुहानाने अगस्त्यला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे. शिवाय सुहानाची आई म्हणजेच गौरी खानने देखील अभिनेत्याला फॉलो केलं आहे. तसंच त्याच्या फोटोवर ‘बिग हग’ आणि इमोजी कमेंट केली आहे.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून अगस्त्य व सुहानाचं अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे. ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघांची चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. तसंच दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना अधिकच वाव मिळाला. पण यावर अजूनपर्यंत अगस्त्य व सुहानाने भाष्य केलं नाही.

हेही वाचा – ट्रोलिंगनंतर बिपाशा बासूने सोशल मीडियावरील मालदीवचे फोटो केले डिलीट, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

अगस्त्य ‘द आर्चीज’नंतर लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. श्रीराम राघवनने एका चित्रपटात अरुण खेत्रपालच्या भूमिकेसाठी अगस्त्यला कास्ट केलं आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल ही भूमिका साकारणार आहेत. याच महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Story img Loader