गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. तर आता ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटामध्ये कोण कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पण या बिग बजेट चित्रपटाची ऑफर अमिताभ बच्चन यांच्या नातवाने नाकारल्याचं आता समोर आला आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. त्या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा झळकावा अशी निर्मात्यांची इच्छा होती. मात्र अगस्त्यने हा चित्रपट नाकारला आहे.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग

आणखी वाचा : श्रीरामांच्या भूमिकेसाठी काहीपण! नो लेट नाईट पार्टी, नो दारू अन्…; रणबीर कपूर करणार ‘या’ गोष्टींचा त्याग

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात अगस्त्यने लक्ष्मणाची भूमिका साकारावी अशी निर्मात्यांची इच्छा होती. त्यानुसार निर्मात्यांनी अगस्त्यला लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी विचारणाही केली होती. पण अगस्त्यने या चित्रपटाला नकार दिला. अगस्त्यला वाटतं की सध्या तो करिअरच्या अशा टप्प्यावर आहे जिथे त्याला एक लोकप्रिय अभिनेता चित्रपटात असताना सहाय्यक व्यक्तिरेखा साकारायची रिस्क घ्यायची नाही आणि म्हणून त्याने चित्रपटाला नकार दिल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा : …अन् बिग बींच्या नातवाकडे पाहून लाजली सुहाना खान, अगस्त्य नंदा व शाहरुखच्या लेकीचा ‘तो’ Unseen Photo व्हायरल

दरम्यान, अगस्त्य झोया अख्तरच्या ‘द अर्चिस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण आता अगस्त्यने ‘रामायण’ला नकार दिल्यामुळे आता या चित्रपटात लक्ष्मणाच्या भूमिकेत कोण दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Story img Loader