ANR Awards 2024: महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांना नुकताच प्रतिष्ठित ‘एएनआर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. चिरंजीवी यांनी या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांचे आशीर्वाद घेतले. हा विशेष सोहळा अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भव्य सोहळ्यात अमिताभ बच्चन यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांबरोबर हजेरी लावली. एका व्हिडीओमध्ये चिरंजीवी व नागार्जुन यांनी अमिताभ बच्चन यांना सोहळ्याच्या ठिकाणी नेले आणि त्यांना त्यांच्या आसनाजवळ नेण्यापूर्वी चिरंजीवी यांनी अमिताभ यांचा परिचय आपल्या आईशी करून दिला.

हेही वाचा…सीन खरा वाटावा यासाठी रणवीर सिंहने केला प्रयोग, पण घडलं भलतंच; हेलिकॉप्टरने न्यावं लागलेलं रुग्णालयात

चिरंजीवी यांच्या आईशी परिचय होताच अमिताभ बच्चन यांनी नम्रतेने त्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. या प्रसंगामुळे चिरंजीवी यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. या हृदयस्पर्शी क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या कार्यक्रमाच्या एका व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन चिरंजीवी यांना पुरस्कार आणि शाल प्रदान करताना दिसत आहेत, आणि त्याच प्रसंगात चिरंजीवी यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

हेही वाचा…अमिताभ बच्चन यांच्यावर कर्ज झाल्याने अभिषेक बच्चनला सोडाव लागलं होत शिक्षण; म्हणाला, “स्टाफकडून पैसे घेण्याची वेळ…”

कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी अनेक तेलुगू कलाकारांशी संवाद साधला. त्यांच्या आगमनानंतर नागार्जुन यांनी आदराने अमिताभ यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. स्टेजवर नागा चैतन्यनेही अमिताभ यांना वाकून नमस्कार केला, त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची वाग्दत्त वधू सोभिता धुलिपालादेखील होती.

अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत आनंद व्यक्त केला. त्यांनी पोस्ट शेअर करीत लिहिलं, “एक भावनिक आणि आठवणींनी भरलेली संध्याकाळ… नागार्जुन यांनी मला या क्षणाचा भाग बनण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”

हेही वाचा…‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते देव आनंद, तिने आजीमुळे दिलेला नकार, नंतर आयुष्यभर राहिलेली अविवाहित

अमिताभ बच्चन यांच्यासह इतर सेलिब्रिटींनाही एएनआर अवॉर्डचा सन्मान

अक्किनेनी इंटरनॅशनल फाउंडेशनने २००५ मध्ये एएनआर पुरस्काराची स्थापना केली होती. २०१४ साली अमिताभ बच्चन यांना हा सन्मान देण्यात आला होता. यापूर्वी देव आनंद, लता मंगेशकर, एस. एस. राजामौली, हेमा मालिनी, श्याम बेनेगल, श्रीदेवी, रेखा, शबाना आझमी, अंजली देवी, वैजयंतीमाला बाली व बालाचंदर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan honors chiranjeevi with anr award touches his mother feet in heartfelt gesture viral video psg