अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांचं नातं गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील चर्चेचा विषय बनलं आहे. त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावे केला. त्यानंतर त्यांनी सून ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं म्हटलं गेलं. नुकतेच अभिषेक, ऐश्वर्या, अमिताभ आणि त्यांचा नातू अगस्त्य नंदा आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात पोहोचले होते. एकंदरीतच बच्चन कुटुंब मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे.
ऐश्वर्या व सासूबाई जया बच्चन यांच्यात बिनसल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांचं एक जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी त्यांच्या वारसदाराची घोषणा केली होती. २०२२ मध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनसाठी एक ट्वीट केले होते. त्यांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा झाली होती. फक्त मुलगा असल्याने कोणीही वारसदार होत नाही, पण त्यासाठी पात्रही असावं लागतं, अशा आशयाच्या काही ओळी त्यांनी शेअर केल्या होत्या. त्यासोबत त्यांनी स्वतःचा व अभिषेकचा फोटो असलेली एक पोस्ट शेअर केली होती.
बिग बींनी त्यांचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या काही ओळी कॅप्शनमध्ये शेअर केल्या होत्या. ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे: जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’ (“माझी मुलं फक्त माझी मुलं असल्याने माझे उत्तराधिकारी होणार नाहीत, जे माझे उत्तराधिकारी होतील, ती माझी मुलं असतील”) अशा त्या ओळी होत्या. याच्या खाली त्यांनी इंग्रजीत लिहिलं होतं, “तो तू आहेस अभिषेक, माझा उत्तराधिकारी… माझा अभिमान, माझा आनंद.”
अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदाला भेट दिला जुहूतील आलिशान बंगला, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हे ट्वीट केलं होतं. त्यांनी अभिषेकचं कौतुक केलं होतं आणि वडील हरिवंशराय बच्चन यांच्या ओळी लिहून अभिषेक त्यांचा उत्तराधिकारी असल्याची घोषणा केली होती.