महानायक अमिताभ बच्चन गेल्या सहा दशकांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहेत. ते ८२ वर्षांचे झाले आहेत. ज्या वयात लोक निवृत्ती घेऊन घरी विश्रांती घेतात, त्या वयातही ते लोकांचे मनोरंजन करत आहेत. बिग बी कामात कितीही व्यग्र असले तरी सोशल मीडियासाठी वेळ काढायला विसरत नाहीत. ते रोज आपल्या ब्लॉगवर आणि सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त होत असतात. पण, शुक्रवारी त्यांनी अशी एक पोस्ट केली ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी रात्री केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. बरेचदा ते त्यांचे फोटो पोस्ट करतात. काही वेळा ते अशा क्रिप्टिक पोस्ट करतात, ज्यामुळे चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागते. त्यांनी शुक्रवारी केलेली पोस्ट अशीच आहे.

अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३४ वाजता एक्सवर एक पोस्ट केली. त्यात ‘जाण्याची वेळ झाली आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे. अमिताभ यांनी ही पोस्ट करताच सोशल मीडियावर लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करू लागले.

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट

amitabh bachchan says time to go
अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट (सौजन्य – एक्स )

अमिताभ बच्चन यांनी अशी क्रिप्टिक पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी अशा पोस्ट केल्या आहेत. फक्त काही शब्दांच्या पोस्ट करून ते त्याबद्दल अधिक बोलत नाहीत. आताही त्यांनी पोस्टमध्ये कुठे जाण्याची वेळ झाली आहे किंवा ते कशाबद्दल बोलत आहेत ते काहीही स्पष्ट केलं नाही. मात्र या पोस्टनंतर चाहत्यांची अस्वस्थता वाढली असून नेमकं काय झालंय ते जाणून घेण्यासाठी ते बिग बींना कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत आहेत.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. पण त्यांनी अशा क्रिप्टिक पोस्ट केल्या की चाहत्यांना त्यांची काळजी वाटू लागते. ही पोस्ट पाहिल्यावरही अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘काय झालं सर’? असं एका नेटकऱ्याने या पोस्टवर कमेंट करून विचारलं आहे. ‘सर असं म्हणू नका’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

Story img Loader