ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी २००७ साली विवाह केला होता. त्यानंतर २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी आराध्या बच्चनचं आगमन झालं. आराध्याचा जन्म १६ नोव्हेंबर २०११ रोजी झाला आणि तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपला आनंद व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक वडील बनल्याने खूप आनंदी होता, पण अमिताभ बच्चन यांचा आजोबा झाल्याचा आनंद काही औरच होता. या प्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावून आनंदात मिठाई वाटली.

हेही वाचा…मुंबईत येऊन झालेले दोनच दिवस; ‘हे’ खलनायक थेट गेले सुनील दत्त यांच्या घरी, खुद्द नर्गिस यांनी वाढलं जेवण; अनुभव सांगत म्हणाले…

ऐश्वर्याने स्वीकारला नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय

ऐश्वर्याची प्रसूती झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं की, बाळ आणि आई दोघेही ठणठणीत आहेत. त्यांनी आपली सून ऐश्वर्याचं विशेष कौतुक केलं होतं, कारण तिने सिझेरियन शस्त्रक्रियेऐवजी नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला, जो आजकाल कमी दिसतो. अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या धैर्याचं कौतुक केलं होतं. असं वृत्त ‘इटाइम्स’ने दिलं आहे.

वेदनाशामक औषधाविना ऐश्वर्याने केली प्रसूती

ऐश्वर्याने कोणतीही वेदनाशामक औषधं न घेता तब्बल दोन-तीन तास प्रसूतीच्या कष्टदायक वेदना सहन करून नैसर्गिक प्रसूती केली. अमिताभ म्हणाले होते, “तिला खूप संघर्ष करावा लागला, परंतु मी तिचं कौतुक करतो की, तिने खूप कष्ट सहन केले आणि नैसर्गिक प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. तिने कोणतंही वेदनाशामक औषध वापरलं नाही.”

हेही वाचा……म्हणून यश चोप्रा यांनी राजेश खन्नांसह काम करणं केलेलं कमी, ‘सिलसिला’ सिनेमाच्या लेखकाने केला होता खुलासा

अमिताभ बच्चन यांनी त्यावेळी सांगितलं होतं की, नवजात मुलगी दिसायला ऐश्वर्यासारखी आहे. मात्र, ते म्हणाले की, याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही, कारण लहान मुलांचा चेहरा प्रत्येक दिवशी बदलत असतो. कुटुंबातील काही सदस्यांना वाटत होतं की, ती अभिषेक आणि जया यांच्यासारखी दिसते.

त्या वेळी बाळाचं नाव अजून ठरलं नव्हतं. काही दिवसांनी कुटुंबाने तिचं नाव ‘आराध्या’ असं ठेवलं. आराध्या आता तेरा वर्षांची असून, ती आई ऐश्वर्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात दिसते. आराध्या आई ऐश्वर्यासारखीच नेहमीच चर्चेत असते.

हेही वाचा…“तू धर्मांतर केलंस”, ७ वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केल्याने आताही ट्रोल होते अभिनेत्री; म्हणाली, “मी हिंदू आहे आणि…”

नुकतंच ऐश्वर्या राय बच्चनला एक पुरस्कार मिळाला आणि याच पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याने आपल्या मुलीची ओळख दाक्षिणात्य सुपरस्टार डॉ. शिवा राजकुमार यांच्याशी करून दिली. तेव्हा शिवा आराध्याशी हात मिळवण्यासाठी पुढे आले, पण आराध्या शिवा यांच्याशी हात न मिळवताच त्यांच्या पाया पडली. हे पाहून शिवा यांनीदेखील तिला आशीर्वाद दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आराध्याच्या या कृतीची सर्वत्र चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan praised aishwarya rai as she opted natural birth for aaradhya without painkillers psg