Amitabh Bachchan Video: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात चाहते आहेत. दर रविवारी त्यांचे असंख्य चाहते त्यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्याबाहेर जमतात. अमिताभ बच्चनदेखील आपल्या चाहत्यांना भेटायला बाहेर येतात. त्यांचे चाहते त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात, त्या ते स्वीकारतात. अनेकदा ते स्वतः चाहत्यांसाठी भेटवस्तू आणतात.

नेहमीप्रमाणे या रविवारीदेखील त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. बिग बींनी बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. हात उंचावून व हात जोडून त्यांनी चाहत्यांची भेट घेतली. याच दरम्यान गर्दीत एका चाहत्याने विठ्ठलाची मूर्ती आणली होती. त्याने ती मूर्ती बिग बी यांच्यासमोर दोन्ही हाताने उंचावली. ही मूर्ती पाहताच अमिताभ बच्चन यांनी हात जोडले.

हेही वाचा – “मागील काही वर्षे खूपच…”, अभिनेता विक्रांत मॅसीने केली निवृत्तीची घोषणा? म्हणाला, “शेवटचे दोन चित्रपट अन्…”

पाहा व्हिडीओ –

‘फिल्मीज्ञान’ या पापाराझी अकाउंटवरून अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत आहेत. अनेकांनी यावर रेड हार्ट इमोजी कमेंट्स केल्या आहेत.

amitabh bachchan fans comments
अमिताभ बच्चन यांच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

हेही वाचा – तीन वर्षांचा संसार अन् २ वर्षांची लेक, प्रसिद्ध अभिनेत्याने लग्नाचे फोटो शेअर करून घटस्फोटाची केली घोषणा

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ते सध्या टीव्हीवरील त्यांचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चे १६ वे पर्व होस्ट करत आहेत. ते शेवटचे मोठ्या पडद्यावर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांनी अश्वत्थामा नावाची भूमिका केली होती. ‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ मधीलसर्वाधिक कमाई करणारा पॅन इंडिया चित्रपट ठरला.