महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी ७ फेब्रुवारी रोजी एक पोस्ट केली होती. तीन शब्दांची त्यांची पोस्ट पाहून चाहते काळजीत पडले होते. अमिताभ बच्चन यांनी ती पोस्ट नेमकी का केली होती, याचा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असतात. ते अनेकदा त्यांच्या एक्स अकाउंटवर अशा पोस्ट करतात ज्या खूप व्हायरल होतात.

बिग बींनी ७ फेब्रुवारीला अशीच एक पोस्ट केली होती. त्यात “जाण्याची वेळ झाली…” असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. आता त्यांनी ही पोस्ट का केली होती, याबद्दल मौन सोडले आहे.

अमिताभ बच्चन ८२ वर्षांचे असून या वयातही ते काम करत आहेत. चित्रपट असो किंवा शो, ते उत्साहाने शूटिंग करताना दिसतात. अचानक त्यांनी ‘जाण्याची वेळ झाली’ अशी पोस्ट केल्याने नेमकं काय घडलंय, ते कशाबद्दल बोलत आहेत अशी चर्चा सुरू झाली. बिग बी चित्रपट आणि ‘कौन बनेगा करोडपती’मधून निवृत्ती घेत आहेत की त्यांची तब्येत ठीक नाही, असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडले होते. आता ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन त्या पोस्टबद्दल बोलताना दिसत आहेत. शोमधील अनेक लोक त्यांना अनेक प्रश्न विचारतात. सगळ्यात आधी एक व्यक्ती बिग बींना डान्स करायला सांगते. ज्यावर ‘कोण नाचणार? अरे, मला इथे नाचायला ठेवलं नाहीये,’ असं ते म्हणतात. मग कोणीतरी त्यांना त्या पोस्टबद्दल प्रश्न विचारतं.

अमिताभ बच्चन यांनी त्यांची पोस्ट वाचली आणि मग काही लोक विचारतात , तुम्ही कुठे चालला आहात? तर काही म्हणतात की तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. यावर बिग बी म्हणाले, “माझी कामावर जाण्याची वेळ झाली आहे. कमाल आहात तुम्ही. मला इथून (केबीसी सेटवरून) रात्री २ वाजता सुट्टी मिळते, घरी पोहोचायला उशीर होतो. रात्री ते लिहिता लिहिता मी झोपी गेलो, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ‘जाण्याची वेळ झाली’ इतकंच लिहिलं आणि मी झोपलो.”

पाहा व्हिडीओ-

२८ फेब्रुवारीला अमिताभ बच्चन यांनी दुसरी एक पोस्ट केली होती. त्यात जावं की थांबावं, असं लिहिलं होतं. आधी जाण्याची वेळ झाली लिहिणाऱ्या बिग बींनी त्याच आशयाची पुन्हा पोस्ट केल्याने ते नेमकं कशाबद्दल बोलत आहेत, याबाबत चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. अखेर त्यांनी यावर उत्तर दिलं असून ते कामाबद्दल होतं असं म्हटलं आहे.