सध्या चित्रपटगृहात सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आहे. ‘रॉकस्टार’, ‘लैला मजनू’, ‘रहना है तेरे दिल में’ असे अनेक सिनेमे चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाले आहेत; तर आगामी काळात काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. यात सप्टेंबर महिन्यात ‘वीर-झारा’, ‘परदेस’, ‘ताल’ हे सिनेमे पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. याच ट्रेंडच्या चर्चा असताना ‘शोले’ या एकेकाळी गाजलेल्या सिनेमाच्या स्पेशल शोचे आयोजन मुंबईतील कुलाब्यात असणाऱ्या रिगल सिनेमागृहात करण्यात आले होते.

या स्पेशल शोला सलीम खान, जावेद अख्तर आणि या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हजेरी लावली होती. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जुने सिनेमे चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होण्याच्या ट्रेंडवर आपले मत व्यक्त केले आहे. रविवारी रात्री बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर ‘संडे दर्शन’चे काही फोटो शेअर केले. यात ते त्यांच्या ‘जलसा’ या घराबाहेर मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहेत.

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

हेही वाचा…RHTDM : एकेकाळी ठरला फ्लॉप, आता हाऊसफुल्ल! २३ वर्षांनी प्रदर्शित झाल्यावर आर माधवनच्या चित्रपटाने कमावले तब्बल…

हा दिग्गज अभिनेता गेल्या ४२ वर्षांपासून दर रविवारी आपल्या घराबाहेर आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर येतो. अमिताभ बच्चन यांनी काल संध्याकाळचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, “आना मेरी जान मेरी जान, संडे की संडे आना, मेरी जान मेरी जान संडे की संडे, कुछ पुराने गानों की झलक, जो आज तक झलक रही हैं; और बीती फ़िल्में को भी अब लोग बड़े पर्दे पर देखना चाहते हैं। मोबाइल पे फ़िल्में देखना कभी सोचा भी न था, और न अब सोच रहे हैं… Who knows whether the old was gold or the gold became old.”

बिग बी या ब्लॉगमध्ये असं म्हणतात की, काही जुनी गाणी आजही लोकांच्या ओठी आहेत आणि आता लोकांना जुने सिनेमेसुद्धा मोठ्या पडद्यावर पाहायचे आहेत. “मी या आधीही कधी मोबाइलवर सिनेमा पाहायचा विचार केला नव्हता आणि आजही असा विचार करत नाही.” “कुणास ठाऊक? जुनं ते सोनं होतं की सोनं हेच जुनं झालं आहे.” अमिताभ बच्चन नेहमी विविध विषयांवर आपल्या ब्लॉग आणि सोशल मीडियावर व्यक्त होत असतात.

हेही वाचा…“… अन् मी दोन महिने रोज रडत होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाला, “मला अचानक…”

दरम्यान, चाहत्यांचे लाडके सुपरस्टार नुकत्याच आलेल्या ‘कल्की २८९८ एडी’ या सिनेमात प्रभास आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसले होते, तर ‘वेतायन’ या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन रजनीकांत यांच्याबरोबर दिसणार आहेत.

Story img Loader