अमिताभ बच्चन यांना बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बी’ यांनी ८० च्या दशकात संपूर्ण हिंदी मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं. त्या काळात अमिताभ यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत होता. पण, पुढे ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री झाली. त्यामुळे अमिताभ यांना हवेतसे चित्रपट मिळत नव्हते. १९९९ मध्ये त्यांच्या व्यावसायिक कंपनीला मोठा फटका बसला आणि ते कर्जबाजारी झाले. बँकेत एकही रुपया नव्हता अशी वेळ त्यांच्यावर आली होती. आयुष्यातील हा कठीण काळ ‘बिग बी’ यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला होता. त्यांचा हा व्हिडीओ अभिजीत चोक्शी यांनी एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अमिताभ यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत सांगत अंबानी कुटुंबीयांचे आभार मानले आहेत.

१९९९ च्या काळात अमिताभ बच्चन यांची एबीसीएल कंपनी पूर्णपणे तोट्यात होती. कंपनीवर भलंमोठं कर्ज होतं. त्यावेळी अमिताभ यांनी आपल्यावर वेगवेगळ्या लोकांचं सुमारे ९० कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. ‘बिग बी’ म्हणाले होते, “वाईट काळात मी खूप काही अनुभवलं. कर्जदार आमच्या दारात यायचे, शिवीगाळ करायचे, धमक्या द्यायचे या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. आमच्या प्रतीक्षा बंगल्यावर देखील जप्ती आली होती. यापेक्षा वाईट काय असू शकतं?”

amitabh bachchan bankrupt abhishek left education
अमिताभ बच्चन यांच्यावर कर्ज झाल्याने अभिषेक बच्चनला सोडाव लागलं होत शिक्षण; म्हणाला, “स्टाफकडून पैसे घेण्याची वेळ…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Amitabh Bahchchan Brother in Law Rajeev Verma
अमिताभ बच्चन यांचे साडू आहेत प्रसिद्ध अभिनेते, दोघांनी एकत्र केलंय काम, तुम्ही त्यांचे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?
Amitabh Bachchan And Sunil Dutta
सुनिल दत्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा करायचे तिरस्कार; १९७१ च्या ‘या’ चित्रपटात दिलेली मुक्याची भूमिका
amitabh bachchan photo amid abhishek bachchan Aishwarya Rai divorce
“जेवढे प्रयत्न…”, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘तो’ फोटो; कॅप्शनने वेधले लक्ष, नेमकं काय घडलं?
vinod khanna amitabh bachchan
ऐन तारुण्यात बॉलीवूड करिअर सोडून धरली होती ओशोंच्या आश्रमाची वाट, अमिताभ बच्चन यांनी समजूत घातली, पण…
Jaya Bachchan Mother health updates
जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी रुग्णालयात, जावयांनी दिली प्रकृतीसंदर्भात माहिती
Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन यांनी फोन करून मागितलेले काम; दिग्दर्शक आठवण सांगत म्हणाले, “रात्रीच्या २ वाजेपर्यंत….”

हेही वाचा : Pooja Sawant Birthday: ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंतचं प्राणीमय जग

रिलायन्स कंपनीच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले, “जेव्हा माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल धीरूभाई अंबानी यांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अनिलला माझ्याकडे पाठवलं. अनिल आणि माझी अनेक वर्षांपासून ओळख होती. तेव्हा धीरूभाईंनी अनिलला जाताना काही पैसे घेऊन जा असा निरोप दिला होता. अनिलने घरी आल्यावर मला सगळं सांगितलं…धीरुभाई तेव्हा जी पैशांची मदत करणार होते त्यामुळे माझ्या सगळ्या समस्येचं अगदी सहज निराकरण झालं असतं. त्यांची उदारता पाहून मला खूप भरून आलं, मी भावुक झालो. मी त्यांची मदत तेव्हा स्वीकारू शकलो नाही. देवाच्या कृपेने कालांतराने दिवस बदलले. मला काम मिळू लागलं आणि आम्ही सर्व कर्ज फेडलं.”

हेही वाचा : व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा, तर लग्न…; प्रथमेश परबच्या अनोख्या लग्नपत्रिकेने वेधलं लक्ष

अमिताभ बच्चन यांनी या कठीण काळानंतर पुढे २००० मध्ये ‘मोहब्बतें’ चित्रपट आणि ‘कौन बनेगा करोडपती’ या टेलिव्हिजन कार्यक्रमातून पदार्पण केलं. यानंतर एके दिवशी अमिताभ धीरूभाई अंबानींच्या घरी एका पार्टीला गेले. तेव्हा धीरूभाई त्यांच्या मित्रांसह पार्टीचा आनंद घेत होते. अमिताभ म्हणाले, “धीरूभाईंनी जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांनी मला त्यांच्याजवळ बसण्यास सांगितलं. मला सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की, हा मुलगा काही महिन्यांपूर्वी अडचणीत होता पण, आज त्याच्या मेहनतीने तो पुन्हा उभा राहिलाय. आज मला त्याचा सर्वाधिक आदर आहे. त्यांचे ते शब्द माझ्यासाठी पैशांच्या मदतीपेक्षा अनेक पटीने जास्त होते.”

दरम्यान, अमिताभ यांची लोकप्रियता या कठीण काळानंतर आणखी वाढली. पुढे त्यांनी, ‘कभी खुशी कभी गम’, ‘आँखे’, ‘बागबान’, ‘खाकी’, ‘देव’, ‘लक्ष्य’, ‘वीर-झारा’, ‘बंटी और बबली’, ‘भूतनाथ’, ‘सरकार’, ‘पा’, ‘पिकू’, ‘पिंक’ अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं.