दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन)(Amitabh Bachchan) यांच्या कामाचे चाहत्यांपासून ते अनेक लोकप्रिय कलाकारांपर्यंत अनेकजण कौतुक करताना दिसतात. कामाप्रति असलेले त्यांच्या समर्पणाची अनेकदा उदाहरणे सांगितली जातात. आता दिग्दर्शक शाम कौशल यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या कामाचे, त्यांच्या प्रेमळ स्वभावाबद्दल सांगितले आहे. शाम कौशल यांचा मुलगा विकी कौशलने जेव्हा मसान चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आमचे आयुष्य बदलले असे शाम कौशल यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण

शाम कौशल यांनी अमिताभ बच्चन यांच्या मर्द चित्रपटात ट्रेनी स्टंटमॅन म्हणून काम केले होते. याबरोबरच जेव्हा ते इतर चित्रपटात व्यग्र होते, त्यावेळी युद्ध या टीव्ही शोमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी कशाप्रकारे विनंती केली होती, याची आठवणदेखील सांगितली आहे. त्यांनी म्हटले, “मला युद्धच्या दिग्दर्शकाने चार दिवसानंतरच्या तारखेसाठी विचारले. मी त्यांना सांगितले माझी इतर ठिकाणी कामे आहेत. अमिताभजी त्यांच्या बाजूलाच बसले होते, त्यांनी तो फोन घेतला. ते मला म्हणाले, “जर तुम्ही येणार नसाल तर मी माझ्या तारखा बदलतो. मी तेव्हाच अॅक्शन करेन जेव्हा तुम्ही तुमच्या तारखा द्याल.” एका दिग्गज कलाकाराने असे म्हटल्यामुळे मी भारावून गेलो होतो. मी माझ्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. मी काही वेळ फक्त बसून राहिलो. मी विचार करत होतो की अमिताभजी माझ्यासाठी त्यांच्या तारखा बदलायला तयार आहेत.कामाप्रति त्यांचे असलेले समर्पण पाहून मला आश्चर्य वाटत होते.”

युद्ध या शोच्या शूटिंगवेळचा आणखी एक किस्सा सांगताना शाम कौशल यांनी म्हटले, “मुसळधार पावसामुळे शूटिंगला उशीर झाला होता. बिग बींना ते शूटिंग संपवून इतर ठिकाणीदेखील जायचे होते. त्यांनी ब्रेक घेऊन जेवण करण्यास नकार दिला आणि ते काम करत राहिले. अमिताभ बच्चन यांनी म्हटले, “मला जेवण तर रोजच मिळते, असे काम कधी कधी मिळते. ” जेव्हा सगळ्यांनी त्यांना जेवणासाठी आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांच्या स्टाफला सँडविच सेटवर आणण्यास सांगितले. त्यावेळी ते चिखलाने माखलेले होते. त्या अवस्थेतच त्यांनी खाल्ले.”

हेही वाचा: “तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”

बिग बींच्या प्रेमळ आणि नम्र स्वभावाविषयी बोलताना शाम कौशल यांनी म्हटले, “जेव्हा मुलगा विकी कौशलने मसान चित्रपटातून पदार्पण केले होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अभिनंदन करणारा मेसेज पाठवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुष्पगुच्छ पाठवला.त्यांनी मेसेज केल्यानंतर आम्ही रात्रभर झोपलो नव्हतो. त्या दिवसानंतर आमचे आयुष्य बदलले.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan refused to take break sandwich ate while covered in mud says vicky kaushal father sham kaushal nsp