अमिताभ बच्चन हे असे अभिनेते आहेत की, ज्यांची सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा होत असते. अनेक चित्रपटांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे ते वर्षानुवर्षे सूत्रसंचालन करीत आहेत. आता या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी स्वत:ला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, याचा खुलासा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा एका प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “हे जे बायकर्स (दुचाकीस्वार) असतात, त्यांची मला फार भीती वाटते. असे म्हटल्यावर त्यांच्यासमोर बसलेल्या स्पर्धकाने १९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाची आठवण करून दिली.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटाची आठवण सांगताना अमिताभ बच्चन म्हणतात, “आम्ही कलाकार कॅमेऱ्यासमोर सगळं काही करू शकतो. आम्ही सगळे कलाकार आहोत आणि एकदा का कॅमेरा सुरू झाला की, आम्हाला आमच्या कलेचे प्रदर्शन करावे लागते. मला गाडी किती उत्तम प्रकारे चालवता येते, असे दाखवावे लागते. पण, तो सीन शूट करताना मला फार भीती वाटत होती. कारण- गाणे म्हणत गाडी चालवायची होती. महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवताना हातदेखील सोडायचे होते. गाडीवरून हात सोडायचे त्यांनी सांगितले नव्हते; मात्र मीच मस्तीमध्ये ते केले आणि तो सीन शूट झाला”, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे.
काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी गाड्यांविषयी त्यांना जी भीती वाटते, त्याबद्दल वक्तव्य केले होते. जॉन अब्राहमने त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कौन बनेगा करोडपती या शोवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने एक किस्सा सांगितला होता. ‘धूम’ चित्रपटाच्या यशानंतर तो त्याच्या गाडीवरून बच्चन कुटुंबाच्या घरी गेला होता. त्यावेळी अभिषेकच्या आधी अमिताभ बच्चन खाली पोहोचले आणि त्यांनी जॉनला सांगितले, “अभिषेकला बाईकसंदर्भात प्रोत्साहन देऊ नको.” ज्यावेळी अभिषेक आला त्यावेळी त्यांनी विषय बदलला आणि म्हणाले, “किती सुंदर बाईक आहे”, अशी आठवण जॉन अब्राहमने सांगितली होती.
हेही वाचा: Shilpa Shetty : लाडकी बहीण योजनेवर शिल्पा शेट्टीची पोस्ट, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी..”
दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या १६ व्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या पर्वात अनेक बदल केल्याचेदेखील पाहायला मिळाले. अमिताभ बच्चन अनेक वर्षांपासून या शोचे यशस्वीपणे सूत्रसंचालन करीत असल्याचे पाहायला मिळते.
अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे, तर नुकतेच ‘कल्की : २८९८ एडी’ या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, दुलकिर सलमान, दिशा पटाणी, मृणाल ठाकूर असे अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत पाहायला मिळाले.