अमिताभ बच्चन मागच्या बऱ्याच वर्षांपासून क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’चं सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये ते अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. या शोमध्ये त्यांनी बरेचदा त्यांच्या खासगी आयुष्याबाबत मजेदार किस्से सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ८० वा वाढदिवस या शोच्या मंचावर साजरा केला होता. त्यानंतर आता त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्याबद्दल एक मजेदार गोष्ट सांगितली आहे. जया बच्चन रोमँटिक झाल्यानंतर काय करतात याबाबत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये बिग बींच्या समोर बसलेला हर्ष सलुजा त्याच्या पत्नीबद्दल बोलताना दिसत आहे. हॉट सीटवर बसलेला हर्ष अमिताभ बच्चन यांना सांगतो, “मी किचनमध्ये जेवणासाठी किंवा जेवण बनवण्यासाठी गेलो तर माझी पत्नी मला बाहेर काढते. यावर बिग बी म्हणतात, ‘म्हणजे किचनमध्ये जाण्यास पूर्णपणे बंदी आहे.’ त्यावर हर्ष म्हणतो की, “मी सांगेन त्याप्रमाणे ती सर्व प्रकारचे पदार्थ बनवते, कधी भांडणं झाली की ती जेवणाच्या डब्यात पत्रं पाठवते आणि माझी समजूत काढते.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांनाही सतावतेय चित्रपट फ्लॉप होण्याची भीती; म्हणाले “हात जोडून विनंती आहे…”

स्पर्धकाच्या या बोलण्यावर, अमिताभ बच्चन त्यांचे दिवस आठवू लागतात आणि जया बच्चन प्रेमात कशा वागतात हे सांगताना दिसतात. हर्षनं अमिताभ बच्चन यांना विचारलं की तुमच्याबरोबर असं काही झालं आहे का? यावर अमिताभ बच्चन म्हणतात, ‘मला पत्रं कधीच मिळाली नाहीत. पण ज्या दिवशी ती प्रेम व्यक्त करते किंवा रोमँटिक मूडमध्ये असते, त्या दिवशी ती मला आवडणारा पदार्थ खायला घालते. अमिताभ बच्चन यांचं हे बोलणं ऐकून उपस्थित सर्व प्रेक्षक हसू लागले.

आणखी वाचा- “त्याने दरवाजा बंद करून…” तब्बल १२ वर्षांनंतर साजिद खानवर प्रसिद्ध मॉडेलने केले गंभीर आरोप

दरम्यान काही काळापूर्वी जया बच्चन त्यांच्या रागामुळे ट्रोलच्या निशाण्यावर आल्या होत्या. जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये त्या पापाराझींना फटकारताना दिसल्या होती. यामुळे अभिनेत्रीला लोकांनी खूप काही सुनावलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan reveal that what jaya bachchan do when she get romantic mrj