अमिताभ बच्चन यांनी सोमवारी त्यांच्या ब्लॉगवर धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याबाबत खुलासा केला. त्यांचे काही मित्र विज्ञान प्रयोगशाळेत शुद्ध दारू पिण्यासाठी एकत्र आले होते व त्यानंतर ते आजारी पडले होते, याबद्दलही अमिताभ यांनी सांगितलं. एक अशी कृती ज्याने त्याच्या दुष्परिणामांबद्दल खूप लवकर धडा शिकवला, असं त्या प्रयोगशाळेतील आठवण सांगत म्हटलं.
अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की दारू आणि सिगारेट सोडणे किंवा पिणे ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे. त्यांनी दारू आणि सिगारेट सोडली कारण ही त्यांची वैयक्तिक निवड होती. अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षांपासून दारू किंवा सिगारेटला हात लावलेला नाही. यावेळी माणूस एकाच वेळी दारू आणि सिगारेट कसे सोडू शकतो, याबद्दलही त्यांनी सांगितलं.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, “प्रॅक्टिकलचा विचार केला की शाळेचे दिवस आठवतात. जिथे शब्द किंवा अभिव्यक्तीचा संदर्भ नेहमी विज्ञान प्रयोगशाळेशी असायला. काही घटकांचे मिश्रण करणे, भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत गॅजेट्रीसह खेळणे. कॉलेजचा रोजचा तोच दिनक्रम असायचा….आणि मग एके दिवशी पदवीचा शेवटचा पेपर संपला व काही मित्र सायन्स लॅबमध्ये दारू पिऊन आनंद साजरा करत होते. ते एकदम शुद्ध दारू पीत होते, पण त्यानंतर ते खूप आजारी पडले. या घटनेने मला मद्यपान करण्याचे दुष्परिणाम व त्याच्या घातक परिणामांबद्दल खूप लवकर धडा शिकवला.”
अमिताभ पुढे लिहितात, “शाळा आणि कॉलेजमध्ये मी अशा अनेक घटना पाहिल्या आहेत जेव्हा दारूच्या या अतिरेकाने कहर केला होता आणि मग जेव्हा मी सिटी ऑफ जॉय अर्थात कोलकाता येथे काम करायला सुरुवात केली तेव्हा मी तिथे ‘सोशल ड्रिंक’ करायला सुरुवात केली. मित्रांसोबत ते सामान्य झाले. मी दारू प्यायचो हे मी नाकारत नाही. परंतु ते सोडणे किंवा पिणे ही वैयक्तिक निवड आहे. होय मी पीत नाही, पण ते का जाहीर करायचे? सिगारेटच्या बाबतीतही असेच काहीसे घडते. ते सोडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ताबडतोब ते सोडण्याचा निर्णय घेणे आणि नंतर ते सोडणे. हा सर्वात सोपा मार्ग आहे. सिगारेट ओठांवर घेऊन क्रश करा आणि कायमचे बाय म्हणा आणि दारू पित असाल वाईनचा ग्लास फोडा,” असा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, बिग बी सध्या घरीच आराम करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रोजेक्ट के या चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांनी ब्रेक घेतला आहे.