रणबीर कपूर(Ranbir Kapoor) हा अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. विविध कार्यक्रमांमधील त्याची उपस्थिती लक्ष वेधून घेते. व्यावसायिक आयुष्याबरोबरच रणबीर कपूर हा त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. कधी आलिया भट्ट, तर कधी त्याची लेक राहा त्याचे कारण ठरते. रणबीर कपूरची लेक राहा अनेकदा सर्वांचे लक्ष वेधून घेते. गेल्या महिन्यात व्हॅलेंटाइन दिवशी अभिनेत्याने त्याचे एआरकेस (ARKS) या लाइफस्टाइल ब्रँडचे उद्धाटन केले. आता यामुळे अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. रणवीर आता पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरला त्यांनी लिहिलेले पत्र पाठवले असून, त्याला त्याच्या नवीन ब्रँडसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रणवीर कपूरच्या एआरकेएस (ARKS) ब्रँडच्या इन्स्टाग्राम पेजवर अमिताभ बच्चन यांनी लिहिलेले पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “प्रिय रणबीर, तू दिलेल्या गिफ्टसाठी मी कृतज्ञ आहे. एआरकेचे स्नीकर मी घालून बघितले. ते खूप छान आहेत आणि कम्फर्टेबलसुद्धा आहेत. तुला तुझ्या या प्रोजक्टेसाठी खूप शुभेच्छा. खूप प्रेम”, असे या पत्रात लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी या पत्रातून रणबीरचे गिफ्ट त्यांना आवडले असल्याचे सांगत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर कपूरच्या एआरकेएस या ब्रँडबद्दल बोलायचे, तर काही काळापासून रणबीर या ब्रँडवर काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये पुरुषांसाठी कॉटन जर्सी टी-शर्ट, प्लश एम्बॉस्ड फ्रेंच टेरी स्वेटशर्ट, विणलेले हुडीज, डबल पिक पोलो शर्ट, विणलेले टी-शर्ट आणि लिनेन शर्ट यांचा समावेश आहे. तर, महिलांसाठी क्रॉप टॉप्स, कॉटन जर्सी टी-शर्ट, फ्लॅट निट पोलो शर्ट आणि कफ्तान टॉप्ससह, टॉप-वेअर, तसेच मॉडल जर्सी हॉल्टर नेक टॉप्स, फ्रेंच टेरी हूडीज व ट्विल बाइकर जॅकेटचा समावेश आहे.

रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र – भाग १ : शिवा’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आलिया भट्ट, मौनी रॉय आणि शाहरुख खान हे कलाकारदेखील दिसले होते. अयान मुखर्जींनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तसेच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. लवकरच रणबीर कपूर संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार आहे. तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचे तर, ते कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत.

Story img Loader