अमिताभ बच्चन हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पोस्ट किंवा ब्लॉगच्या माध्यमातून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत असतात. त्यांना आलेले अनुभव ते प्रेक्षकांशी चाहत्यांशी करत असतात. आता नुकताच त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कोलकाता येथे राहत असत. तिथल्या अनेक आठवणी त्यांच्या मनाच्या जवळ आहेत. त्याबद्दल बोलताना यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं, “ब्लॅकर्स कंपनीमध्ये काम करण्याचा माझा शेवटचा दिवस ३० नोव्हेंबर १९६८ आणि पगार १,६४० रुपये. ही फाईल मी आजही जपून ठेवली आहे.”

आणखी वाचा : Video: मुलीच्या जन्मानंतर आलिया पहिल्यांदाच दिसली सार्वजनिक ठिकाणी, तिची अवस्था पाहून सर्वांनाच बसला धक्का

हेही वाचा : रामजन्मभूमीचा ५०० वर्षांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अवतरणार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपटाशी असणार खास कनेक्शन

पुढे त्यांनी लिहिलं, “कोलकाता येथील माझं वास्तव्य हे अत्यंत स्वतंत्र आणि स्वछंदी असायचं. त्यावेळी मी दहा बाय दहा स्क्वेअर फुटच्या खोलीमध्ये सात जणांबरोबर राहायचो. ऑफिस झाल्यानंतर आम्ही कोलकातामधील प्रसिद्ध ठिकाण बघायला जायचो. आम्हा कोणाकडेच तेव्हा फारसे पैसे नसायचे. पण एक दिवस आम्ही यशस्वी होऊ अशी अशा आम्हा सर्वांनाच होती, जे स्वप्न आम्ही प्रत्येकाने पूर्ण केलं….जशी वर्ष सरली तसं आता सगळंच बदललं आहे…” त्यांचा हा ब्लॉग त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्यांचे चाहते या ब्लॉगवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.