Amitabh Bachchan talks about Mumbai Rain: अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मोठ्या चर्चेत असतात. कधी चित्रपट, कधी सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी कुटुंबामुळे ते सतत चर्चांचा भाग बनतात. आता नुकतेच त्यांनी जया बच्चनसाठी असे काही केले की, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. मुसळधार पावसात त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्या डोक्यावर छत्री धरली आहे; तर जया बच्चन हातात लाडूचा डबा घेऊन उभ्या असलेल्या या फोटोत दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी, “रोज पाऊस पडतो, कामाच्या सेटवरदेखील!” असे म्हटले आहे.

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Rahul Gandhi criticized media for focusing on Ambanis wedding Adani and Modi not on farmers
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!

Amitabh Bachchan पावसाबद्दल काय म्हणाले?

एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो शेअर करीत, पावसाळ्याबद्दल लिहिले होते. दिवसभर पाऊस पडतो, कामाच्या ठिकाणीसुद्धा, असे त्यांनी म्हटले होते. बिग बींनी जे फोटो शेअर केले होते, त्यामध्ये काही जण पावसाचा आनंद घेताना दिसत होते. त्याबरोबरच अभिनेत्याने पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल मुंबईत अचानक येणाऱ्या पुराबद्दल लिहिताना चिंता व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते, “कडक उन्हाळ्यानंतर येणारा पाऊस म्हणजे आशीर्वादच आहे. मात्र, शेती क्षेत्राला फायदा सोडला, तर पूर, भूस्खलन अशा विनाशकारी घटना घडतात. अशा पावसामुळे मोठं नुकसान होतं. अनेक घरं उद्ध्वस्त होता. प्रत्येक वर्षी हे घडत राहतं. अशा वेळी दु:ख वाटतं, असहाय वाटायला लागतं. जे नुकसान होतं, त्याचं वर्णन करणं कठीण आहे. मात्र सगळं काही सुव्यवस्थित व्हावं आणि सर्वांचं कल्याण व्हावं हीच प्रार्थना आहे”, असे म्हणत पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी त्यांनी चिंता व्यक्त करीत प्रार्थना केली आहे. बिग बींनी २०१८ मध्ये केरळच्या पूरग्रस्तांना मदत केली होती. ‘रेसुल पुकुट्टी फाउंडेशन’च्या माध्यमातून केरळच्या ‘सीएम डिस्ट्रेस रिलीफ फंड’ (CMDRF)मध्ये आपल्या वैयक्तिक वस्तूंसह ५१ लाखांची देणगी देऊन मदत केली होती.

अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास, नुकतेच कल्की : २८९८ एडी या चित्रपटात ते दिसले होते. या चित्रपटात त्यांनी निभावलेल्या भूमिकेचे कौतुक होताना दिसत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त भारतातच नाही तर, संपूर्ण जगभरात या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याने वडिलांबरोबरचा ‘तो’ सीन पाहून शर्मिला टागोर यांना मारली होती झापड; म्हणाला, “आजही जेव्हा मी…”

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासमवेत अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन या मायलेकीची जोडी त्यांच्याबरोबर न येता वेगळी आल्याने बच्चन कुटुंबात काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते.