‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. यामध्ये होस्ट अमिताभ बच्चन स्पर्धकांशी गप्पा मारतात. अनेकदा ते त्यांच्या आयुष्यातील किस्सेही स्पर्धकांना सांगतात. या शोच्या ताज्या एपिसोडमध्ये गुजरातमधील वडोदरा येथील सॉफ्टवेअर डेव्हलपर आशुतोष सिंह या स्पर्धकाने हजेरी लावली. आशुतोषने त्याच्या आई-वडिलांच्या इच्छेविरोधात लग्न केल्याने त्यांनी त्याच्याशी संबंध तोडले. तसेच ते आता बोलत नसल्याचं आशुतोषने सांगितलं.
आशुतोष म्हणाला, “मी पाच वर्षांपासून माझ्या आई-वडिलांशी बोलत नाही. मला माहीत आहे की ते नियमितपणे केबीसी पाहतात, त्यामुळे इथं येणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं, जेणेकरून मी तुमच्याशी याबद्दल बोलू शकेन आणि कदाचित ते आपलं बोलणं ऐकू शकतील.” यानंतर अमिताभ म्हणाले, “मला आशा आहे की आजचा भाग पाहिल्यानंतर, तुमचे आई-वडील तुमच्याशी पुन्हा बोलतील आणि तुमच्यातील संवाद पुन्हा सुरू होईल.”
स्वतःच्या लग्नाचे उदाहरण देत बिग बी म्हणाले…
आशुतोषने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शोमध्ये सांगितल्यावर अमिताभ यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाचे उदाहरण दिले. अमिताभ यांनी घरातल्या बहुपेडी संस्कृती वातावरणाबद्दलही सांगितलं. त्यांनी स्वत:च्या लग्नाचंही उदाहरण दिलं. बिग बी मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत, तर त्यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन या पश्चिम बंगालच्या आहेत. त्यांची मुलगी श्वेता बच्चनचं लग्न पंजाबी कुटुंबात झालं आहे. तर अमिताभ यांचा मुलगा अभिषेकचं लग्न अभिनेत्री ऐश्वर्या रायशी झालं आहे. ती मंगलोरची आहे.
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
अमिताभ यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट केबीसीच्या व्यासपीठावर सांगितली. “मी, उत्तर प्रदेशचा. जया बंगालच्या. दोन्ही राज्यांची संस्कृती वेगवेगळी आहे. आमच्या लग्नाच्या निमित्ताने या दोन राज्यांची संस्कृती आणि जीवनशैली यांचाही संगम झाला. माझ्या भावाने सिंधी कुटुंबातील मुलीशी लग्न केलं. माझ्या मुलीचं लग्न पंजाबी कुटुंबात झालं आहे, आणि माझा मुलगा, तुम्हाला माहिती आहे… मंगलोर.” ऐश्वर्या रायचे कुटुंब मूळचे मंगलोरचे आहे.
हेही वाचा – Video: गर्दीत चाहत्याने आणलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्…; अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेचं होतंय कौतुक
वडील हरिवंश राय बच्चन यांचे शब्द आठवत अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “माझे वडील म्हणायचे की प्रत्येकाने देशाच्या कानाकोपऱ्यात लग्न केले आहे.”
अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. त्यांनी १९७३ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांची मुलगी श्वेता हिचं लग्न उद्योगपती निखिल नंदा यांच्याशी झालंय, नंदा हे पंजाबी आहेत. तर अभिषेक व ऐश्वर्या यांनी २००७ मध्ये लग्न केलं. या जोडप्याला आराध्या नावाची मुलगी आहे.