मराठी चित्रपटसृष्टीतील ‘महागुरु’ म्हणजेच सचिन पिळगांवकर यांचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतही अतिशय अदबीने घेतलं जातं. फार लहान वयातच ते कॅमेराला सामोरे गेले आणि तिथून त्यांची अभिनय क्षेत्रातील करकीर्दी कशी बहरत गेली हे आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. त्यांनीदेखील त्यावेळचे किस्से सांगितले आहेत. आज आम्ही तुम्हाला कधीच न ऐकलेला असा एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा आहे ‘शोले’च्या चित्रीकरणादरम्यानचा.

मध्यंतरी एका लोकप्रिय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरुन सचिन पिळगांवकर यांना आजही प्रचंड ट्रोल केलं जातं. त्या मुलाखतीमध्ये सचिन पिळगांवकर यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन हे त्यांना ज्युनिअर होते. खुद्द सचिन यांनी हे वक्तव्य त्या मुलाखतीदरम्यान केलं आणि तमाम बच्चन फॅन्स प्रचंड नाराज झाले. सगळ्यांनी सचिन पिळगांवकर यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांच्या त्या वक्तव्यावरून आजही त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आज त्यांच्या याच वक्तव्यामागचा एक खरा किस्सा सांगणार आहोत.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
itin gadkari on Secularism word meaning
Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या पत्नी अनुपम चोप्रा यांनी ‘शोले – द मेकिंग ऑफ अ क्लासिक’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला चित्रपटक्षेत्राशी संबंधित उत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. २००० साली पेंगविन पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकात अनुपमा यांनी ‘शोले’ चित्रपटाशी निगडीत आणि त्याच्या मेकिंगदरम्यानचे किस्से सांगितले आहेत. त्यापैकीच एक किस्सा आहे ज्यामध्ये खुद्द बच्चन हे सचिन पिळगांवकर यांना एका सिनिअरप्रमाणे वागवत होते असं स्पष्ट लिहिलं आहे.

हा किस्सा ‘शोले’मधील त्या दृश्यादरम्यानचा आहे जेव्हा तरुण अहमदला (सचिन पिळगांवकर) मारून गब्बर त्याचं शव घोड्यावरून रामगढ मध्ये पाठवून देतो. तेच दृश्यं जेव्हा सगळे गावकरी सुन्न असतात आणि रहीम चाचा त्यांचा अजरामर संवाद फेकतात “इतना सन्नाटा क्यू है भाई?” याचं चित्रीकरण करताना दिग्दर्शक रमेश सिप्पी हे घोड्यावर शव म्हणून सचिन पिळगावकर यांचा बॉडी डबल वापरायचा विचार करत होते, पण सचिन यांनी तसं करण्यास नकार दिला आणि स्वतः सचिननी मृत अहमदचा अभिनय करायचा ठरवला. तो घोडा मोकळ्या जागी आल्यावर जय आणि विरू ते शव उचलून खाली ठेवणार असं ते दृश्यं होतं.

चित्रीकरणाच्या थोडावेळ आधी अमिताभ बच्चन हे तरुण सचिनच्या कानात पुटपुटले की, “तू तुझं शरीर एकदम ताठ ठेव, शरीर ढिलं सोडलंस तर ते शरीर मृत शव म्हणून खाली उतरवणं कॅमेरामध्ये सहज वाटणार नाही.” सचिननी होकारार्थी मान हलवली आणि त्या दृश्याचं चित्रीकरण पूर्ण झालं आणि दिग्दर्शक यांनी तो शॉट ओके केला. सचिन यांचा तो अभिनय पाहून बच्चन खुद्द दंग होते, सचिनच्या या कामामुळे ते चांगलेच प्रभावीत झाले. तो शॉट ओके झाल्यानंतर अमिताभ यांनी सचिन यांना विचारलं की, “तू किती चित्रपटात काम केलं आहेस?” बच्चन यांचा हा प्रश्न ऐकताच तरुण सचिन यांनी तडख उत्तर दिलं की, “जवळपास ६० चित्रपटात.” सचिन यांचं हे उत्तर ऐकून अमिताभ बच्चन यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कुतूहल म्हणून बच्चन यांनी सचिन यांना कधीपासून काम करत आहात असा प्रश्न विचारला तेव्हा सचिन यांनी सांगितलं की ते १९६२ पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’च्या अडचणीत आणखी वाढ; अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी केली बॉयकॉटची मागणी

हे ऐकून बच्चन यांच्या मनातला सचिन पिळगांवकर यांच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला. यानंतर ‘शोले’च्या सेटवर बच्चन यांनी कायम सचिन यांना एका सिनीअर व्यक्तिप्रमाणे वागणूक दिली होती. सचिन पिळगांवकर यांच्या त्या मुलाखतीमधील वक्तव्यामागचा हा किस्सा फारसा कुणालाच ठाऊक नाही. हा किस्सा वाचून नक्कीच म्हणता येईल की बच्चन हे खरंच सचिन पिळगांवकर यांना ज्युनिअर होते.

Story img Loader