बॉलीवूडचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांना कलाविश्वात ओळखलं जातं. बिग बींप्रमाणे त्यांचं कुटुंब सुद्धा कायम चर्चेत असतं. बच्चन कुटुंबीयांनी नुकतीच अगस्त्य नंदाच्या ‘द आर्चीस’ चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र हजेरी लावली होती. अगस्त्य हा अमिताभ-जया यांची लेक श्वेता नंदाचा मुलगा आहे. झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ चित्रपटातून त्याने नुकतंच बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोरंजनसृष्टीत बच्चन कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. मध्यंतरी ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, ‘द आर्चीस’च्या प्रीमियरला ऐश्वर्या-अभिषेकने एकत्र हजेरी लावली होती. अशातच आता अमिताभ बच्चन यांनी सूनबाई ऐश्वर्याला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी उपेंद्र लिमयेंनी दिलेला नकार; किस्सा सांगत म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने स्वत:हून मला…”

अमिताभ बच्चन यांचे सध्या इन्स्टाग्रामवर एकूण ३६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. यामध्ये बिग बी फक्त ७४ लोकांना फॉलोबॅक करतात. या ७४ जणांच्या यादीत अभिषेकसह बॉलीवूडमधील अन्य कलाकारांचा समावेश आहे. परंतु, यात ऐश्वर्या रायचं नाव दिसत नाही. अमिताभ बच्चन यांनी सुनेला अनफॉलो केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय ऐश्वर्याला वाढदिवसानिमित्त फक्त अभिषेकने शुभेच्छा दिल्या होत्या. नवऱ्या व्यतिरिक्त तिच्यासाठी सोशल मीडियावर कोणीही पोस्ट शेअर केली नव्हती.

हेही वाचा : “दोघांच्या घरातून ठळक विरोध…”, ‘अशी’ जमली शिवानी सुर्वे अन् अजिंक्यची जोडी; अभिनेत्री म्हणाली, “त्याचे बाबा…”

अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम

अमिताभ यांनी सुनेला अनफॉलो केल्यामुळे एकीकडे चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे मात्र बच्चन कुटुंबाच्या काही चाहत्यांनी बिग बी याआधी सुद्धा ऐश्वर्याला फॉलो करत नव्हते असा दावा केला आहे. दरम्यान, बच्चन कुटुंबाच्या कौटुंबिक वादाच्या चर्चांदरम्यान नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द आर्चीस’ चित्रपटाच्या प्रीमियरला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, जया बच्चन, आराध्या बच्चन, अजिताभ बच्चन, निखिल आणि श्वेता नंदा अशा संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्रित हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan unfollowed aishwarya rai on instagram amid family dispute sva 00