पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित २०१९ साली हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. मोदींच्या बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला होता. अभिनेता विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका या चित्रपटात साकारली होती. आता मोदींवर आणखी एक चित्रपट येण्याची दाट शक्यता आहे. नुकतंच निर्माती प्रेरणा अरोराने मोदींवर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच या चित्रपटात मोदींच्या भूमिकेसाठी महानायक अमिताभ बच्चन ही पहिली निवड असल्याचेही प्रेरणा अरोराने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा – इर्शाळवाडी गावाचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत गिरीश ओक म्हणाले, “आताच्या त्रासापेक्षा नंतरची हळहळ जीवघेणी”
‘झूम’ या एन्टरटेनमेंट वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, “भारतात सर्वात डायनॅमिक, सक्षम व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींवर चित्रपट करू इच्छिते. या चित्रपटात मोदींच्या भूमिकेसाठी मला अमिताभ बच्चन योग्य वाटतात. कारण त्यांच्यापेक्षा जास्त कोणीही या भूमिकेला सूट होणार नाही.”
हेही वाचा – “इज्जत की बची ना चिंधियाँ, वहाँ बिके पवार और सिंधिया…”; मणिपूरच्या घटनेवर स्वानंद किरकिरेंचा सणसणीत टोला
चित्रपटाच्या कहाणीच्या बाबतीत बोलताना प्रेरणा म्हणाली की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या पैलूंवर आधारित हा चित्रपट असेल. जास्त करून पंतप्रधान झाल्यानंतरच्या घटना अधिक असतील. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या उद्देशाने अनेक परकीय धोरणे आणण्यापासून ते कोरोना महामारी हाताळण्यापर्यंत आणि लसीकरण असं सर्व काही या चित्रपटात दाखवण्यात येईल.”
हेही वाचा – शितलीची तिसरीही मालिका ठरली फ्लॉप; आता ‘लवंगी मिरची’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
दरम्यान, प्रेरणा अरोराने यापूर्वी ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील आधारित चित्रपट कधी अमलात आणतेय, हे येत्या काळात समजेल.