नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाने सगळे रेकॉर्ड्स मोडत जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. आता थोड्याच दिवसांत हा चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन व दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात बिग बींनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. त्यांचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमिताभ बच्चन गेली ५५ वर्षे या बॉलीवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. परंतु, आजही त्यांच्या मनात प्रत्येक सीनबद्दल अगदी लहान मुलांसारखी उत्सुकता असते आणि हे आजच्या पिढीने शिकण्यासारखं आहे असं ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितलं. हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून या संपूर्ण प्रवासात खूप काही शिकल्याचं दिग्दर्शकाने ‘इंडिया टूडे’शी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा : “मी दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो पण, आता…”, करण जोहरचा वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा, म्हणाला…

दिग्दर्शक नाग अश्विन अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगतात, “बिग बींच्या मनात ते चित्रपटात ८ फूट उंच कसे दिसतील हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु, एवढे मोठे अभिनेते असूनही त्यांनी कधीच कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप केला नाही. प्रत्येक गोष्ट ते धीराने घ्यायचे. शूटिंगसाठी एवढा प्रोस्थेटिक मेकअप, विग व दाढी लावून बसायचे पण, कधीच कोणत्याही गोष्टीची त्यांनी तक्रार केली नाही.”

“चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग जेव्हा सुरू झालं, तेव्हा सेटवरची त्यांची एक गोष्ट पाहून मी पूर्णपणे नि:शब्द झालो होतो. आम्हाला शूटिंग करताना एके दिवशी खूप उशीर झाला होता. लवकरात लवकर शूटिंग पूर्ण होईल यासाठी आमची टीम खूप प्रयत्न करत होती. एवढ्यात अमिताभ बच्चन सर तिथे आले…आता त्यांना पाहिल्यावर मी त्यांना उशीर का झाला याची कारणं सांगणार होतो…पण, झालं उलटंच. “मी फक्त रेस्टरुमध्ये ( फ्रेश होण्यासाठी ब्रेक ) जाऊन पुन्हा येऊ शकतो का?” असं त्यांनी विचारलं. त्यावर मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नव्हतं मी म्हणालो, ‘सर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करू शकता…तुम्हाला मला विचारण्याची आवश्यकता देखील नाही.’ ते खरंच खूप महान कलाकार आहेत.” असं दिग्दर्शक नाग अश्विन यांनी सांगितलं.

हेही वाचा : अमेरिकेहून भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार? सेटवरील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, संतोष नारायणन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. त्याचबरोबर अश्विनी दत्त यांनी वैजयंती मुव्हीजच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan would ask for permission to use restroom during kalki 2898 ad shoot reveals director nag ashwin sva 00