धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचे दिसले. यामध्ये करिना कपूर, सैफ अली खान, शाहिद कपूर, बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान याबरोबरच अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन असे अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या शाळेत या कलाकारांची मुले शिक्षण घेत असून त्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी हे कलाकार आले होते. कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी हे कलाकार हजर राहिले. ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन त्यांच्या मुलीला आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. पहिल्या दिवशी अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)देखील हजर राहिले होते. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या-अभिषेक अभिनेत्रीच्या आईसह हजर राहिल्याचे दिसले.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये या कार्यक्रमाचा अनुभव लिहित मुलांचे कौतुक केले आहे. बीग बींनी लिहिले, “मुले, त्यांची निरागसता आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सर्वोत्तम परफॉर्मन्स करण्याची इच्छा. जेव्हा ते हजारो लोकांच्या सहवासात तुमच्यासाठी परफॉर्म करत असतात, तेव्हा तो सर्वात आनंददायक अनुभव असतो.”

Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
jaya bachchan on amitabh bachchan and rekha affair
जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चांवर केलेलं ‘ते’ वक्तव्य; म्हणालेल्या, “तर माझं आयुष्य…”

अभिनेता इशान खट्टरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. शाहिद कपूरच्या मुलांना मिशा व झैन यांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी त्याने हजेरी लावली होती. अंबानी कुटुंबानेदेखील हजेरी लावल्याचे दिसले. या कार्यक्रमात अभिनेत्रीने करिना कपूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तैमुर व जेहच्या परफॉर्मन्सवेळी अभिनेत्रीने त्या दोघांना ज्या पद्धतीने प्रोत्साहन दिले, त्यामुळे तिचे मोठे कौतुक होताना दिसत आहे.

बच्चन कुटुंब गेल्या काही काळापासून चर्चांचा भाग आहे. ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोट घेणार या चर्चांना उधाण आले होते. याबरोबरच, अभिषेक बच्चनबरोबर अभिनेत्री निम्रत कौरचे नावही जोडले गेले. मात्र, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, निम्रत कौर किंवा बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यावर भाष्य केले नाही. आता काही दिवसांपासून ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन विविध कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. अनेकदा त्यांनी फोटोंसाठी एकत्र पोजदेखील दिली आहे. याबरोबरच, ऐश्वर्या व आराध्या या मायेलकीच्या बॉण्डिंगचे सातत्याने चाहत्यांकडून कौतुक होताना दिसते.

हेही वाचा: ‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर अभिनेते सध्या कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय टीव्ही शोचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर ते विविध किस्से सांगत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

Story img Loader