एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरमध्ये बरेच बदल केले जात असल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला ट्विटरने सुरुवात केली आहे. जगभरातील अनेक दिग्गज मान्यवर, नेतेमंडळी, अभिनेते, खेळाडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावापुढील ब्लु टीक हटवण्यात आली होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अस्सल इलाहबादी भाषेत ट्वीट करत ब्ल्यू टिक पुन्हा लावण्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर अमिताभ यांना ब्ल्यू टिक मिळाली. ब्ल्यू टिक मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा मिश्किल शैलीत तीन ट्वीट केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे हे ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video: “बस झालं आता…”; पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या, “माझ्यापासून..”

अमिताभ बच्चन यांनी रात्री एक वाजता तीन ट्विट केले आहेत. त्यात ते म्हणतात, ए मस्क भैया… मी तुला खूप खूप धन्यवाद देत आहे. तू माझ्या नावाच्या पुढे ब्ल्यू टिक लावली आहेस. आता तुला काय सांगू? एक गाणं गुणगुणावसं वाटतंय. ऐकतोयस ना? मग ऐक… तू चीज बडी है मस्क मस्क…तू चीज बडी है मस्क मस्क… असं गंमतीशीर ट्विट अमिताभ यांनी केलं आहे.

त्यानंतर अमिताभ यांनी दुसरं ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी ट्विटरला चक्क मौसी (मावशी) म्हटलं आहे. अरे ट्विटर मौसी… गजबच झालं. ब्ल्यू टिक लावल्यानंतर आता ब्ल्यू टिक एकटा असून तो घाबरत आहे. त्यामुळे त्याला साथ द्यावी असं मला वाटलं. त्यामुळे त्याच्या बाजूला मी झेंडा लावला. झेंडा लावून काही क्षणही झाला नाही तोच ब्ल्यू टिक गायब झाला. आता? काय करू?; अशी मिश्किल विचारणा अमिताभ यांनी केली आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये अमिताभ यांनी ट्विटरला मौसी का म्हटलंय हे सांगितलंय. हे बओघा… आणखी अडचण आलीय. ट्विटरला तू भाऊ म्हणतोस आणि आता मावशी कशी झालीय? तर मी त्यांना समजावलं की, ट्विटरवर आधी श्वान आलं तेव्हा त्याला भाऊ म्हटलं. पुन्हा त्यांनी ट्विटरवर चिमणी आणली. आता चिमणी तर मावशीच असते ना… असं म्हणत अमिताभ यांनी ट्विटरला मावशी का म्हटलंय हे स्पष्ट केलं आहे.

एलॉन मस्कनं २० एप्रिलपासून सर्व लेगसी अकाऊंटचे ब्लू टिक काढले जातील असं जाहीर केलं होतं. पैसे मोजून ब्लू टिक घेणाऱ्यांनाच आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्रीच या सर्व अकाऊंट्सवरून ब्लू टिक काढून टाकण्यात आली. आता वेबसाईटवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ८ डॉलर प्रतिमहिना तर मोबाईल अॅपवरून पेमेंट करणाऱ्यांसाठी ११ डॉलर प्रतिमहिना असे दर आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे.