सलमान खान हा गेले काही महिने त्याच्या आगामी चित्रपटांसाठी खूपच चर्चेत आहे. ‘टायगर ३’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. सलमान त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावामुळेही बऱ्याचदा चर्चेत असतो. नुकतंच सलमानने ‘फिल्मफेअर’च्या प्रेसमीट मध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात सलमानने बऱ्याच गोष्टींवर त्याचं मत मांडलं आणि पत्रकारांशी गप्पा मारल्या.
याबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट आणि त्यावर येणारा बीभत्स अश्लील कंटेंट याबद्दलही सलमानने भाष्य केलं. या विषयावर सलमानने त्याची रोखठोक बाजू मांडली आहे. इतकंच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशीप येण्याबद्दलही त्याने बाजू मांडली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नग्नता, अश्लीलता, शिवीगाळ हे सगळं थांबायला हवं असं परखड मत सलमान खानने मांडलं. सलमानच्या या वक्तव्याला नुकतंच वर्धन पुरी याने खोडून काढलं आहे.
आणखी वाचा : “हिला पद्मश्री पुरस्कार कशासाठी?” असं विचारणाऱ्या ट्रोलर्सना रवीना टंडनचं चोख उत्तर, म्हणाली…
ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरी याने सलमान खानच्या या वक्तव्याला खोडून काढलं आहे. सुजाण प्रौढ प्रेक्षकांना त्यांना काय बघायचं स्वातंत्र्य हवं असं वर्धन पुरी याने सांगितलं आहे. एका मीडिया पोर्टलशी संवाद साधताना वर्धन म्हणाला, “इतरांच्या मताचा मी आदर करतो, पण सेन्सॉरशीपमुळे कलाकारांच्या कल्पकतेवर बंधनं येतील असं माझं मत आहे.” या गोष्टीला तो स्वतः विरोध करत असल्याचं त्याने यात सांगितलं.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सेन्सॉरशीपबद्दल सलमानने दिलेल्या वक्तव्यात तो म्हणाला, “मला खरोखर असं वाटतं की या माध्यमांवर कोणाचा तरी अंकुश असावा. ही अश्लील दृश्यं, नग्नता, शिवीगाळ हे सगळं थांबायला हवं. सध्या १५-१६ वर्षांची मुलंही हे बघतात, अभ्यासाच्या नावावर एखाद्या १६ वर्षाच्या लहान मुलीने मोबाईलवर हे सगळं बघितलं तर ते तुम्हाला तरी आवडणार आहे का? ओटीटीवर येणारी प्रत्येक गोष्ट तपासली गेलीच पाहिजे. कंटेंट जेवढा स्वच्छ असेल तो पाहण्यासाठी लोक तेवढीच गर्दीही करतील.”