अभिनेते राकेश रोशन आणि त्यांचा मुलगा हृतिक रोशन यांच्या करिअरमधील हिट चित्रपटांच्या यादीतील सुपरहिट ठरलेला एक चित्रपट म्हणजे क्रिश. क्रिश या सीरिजमधील सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जादू केली. क्रिश या तिन्ही चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन हा मुख्य भूमिकेत झळकला होता. तर त्याच्याबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्क्रीन शेअर केली होती. पण या चित्रपटासाठी सुरुवातीला निर्मात्यांनी प्रियांकाऐवजी दुसऱ्याच एका अभिनेत्रीची निवड केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हृतिक रोशन यांचा क्रिश हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाची कथा आणि स्टार कास्ट यामुळे हा चित्रपट चांगलाच गाजला. क्रिश चित्रपटातील सर्वच सिरीजमध्ये प्रियांका आणि हृतिकची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. पण राकेश रोशन यांनी ‘क्रिश’ या चित्रपटासाठी प्रियांकाऐवजी अभिनेत्री अमृता रावला निवडले होते. विशेष म्हणजे त्यांनी तिची कास्टिंगही केली होती. पण ऐनवेळी राकेश रोशन यांना प्रियांकाला या चित्रपटात घ्यावे लागले.
आणखी वाचा : Video : चॅनल शिव ठाकरेला हरवण्यासाठी प्रयत्न करतंय? बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचा गंभीर आरोप, प्रियंकाचा उल्लेख करत म्हणाला…

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

राकेश रोशन यांनी अमृता आणि हृतिकचे चित्रपटासाठी एक फोटोशूट केले होते. पण फोटोशूटनंतर त्यांना हृतिक आणि माझी केमिस्ट्री फारशी आवडली नाही. अमृता रावने २००६ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दलचा उल्लेख केला होता.”

“क्रिश चित्रपटासाठी हृतिक आणि माझे फोटोशूट करण्यात आले होते. पण आमच्यामधील केमिस्ट्री इतकी चांगली नव्हती. मी हृतिकच्या तुलनेत खूप लहान आणि तरुण वाटत होते. मला हा चित्रपट गेल्याचे अजिबात दु:ख वाटत नाही. कारण शेवटी तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टीच तुम्लाहा आयुष्यात मिळतात”, असे ती म्हणाली होती.

“मी खरंच खूप भाग्यवान आहे कारण राकेश रोशन, हृतिक रोशन यांना माझे सर्व चित्रपट आवडले आहेत. मी त्यांच्या कुटुंबात सर्वांना आवडते. मलाही ते फार छान वाटतं. कारण रोशन कुटुंब सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखले जाते”, असेही तिने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “सैफ अली खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मी…” अमृता सिंगने सांगितलं दुसरं लग्न न करण्यामागचं खरं कारण

दरम्यान अमृताने ‘मै हूँ ना’, ‘वाह लाईफ हो तो ऐसी’, ‘अब के बरस’, ‘विवाह’, ‘ठाकरे’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून ‘क्रिश ४’ चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात देखील हृतिकबरोबर अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसणार असल्याचे बोललं जात आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम सुरु आहे. लवकरच याचे चित्रीकरण सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Story img Loader