८०-९० च्या दशकातली आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता सिंहला ओळखलं जातं. आज अमृताचा ६५ वा वाढदिवस. आपल्या कारकिर्दीत बरेच हिट चित्रपट दिले. मात्र चित्रपटांपेक्षा अमृताचं खासगी जीवन जास्त चर्चेत राहिलं. अमृताची तीन अफेअर्स सर्वाधिक गाजली. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी लग्न करण्याआधी अमृताचं नाव अभिनेता सनी देओल, विनोद खन्ना आणि क्रिकेटर रवी शास्त्री यांच्याशी जोडलं गेलं होतं. पण या तिघांपैकी एकही नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
अमृताने तिच्या करिअरची सुरुवात ‘बेताब’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता सनी देओलची मुख्य भूमिका होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार याच चित्रपटाच्या सेटवरून अमृता आणि सनीच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. मात्र काही काळानंतर अमृताला समजलं की सनी देओलने इंग्लंडमध्येच पूजा नावाच्या एका मुलशी लग्न केलं. पहिल्या प्रेमात अपयश आल्यानंतर अमृता मनातून खचली होती. त्यानंतर तिने आपलं सर्व लक्ष फक्त करिअरवर केंद्रीत केलं.
आणखी वाचा- “सैफ अली खानबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर मी…” अमृता सिंगने सांगितलं दुसरं लग्न न करण्यामागचं खरं कारण
१९८० मध्ये अमृताची ओळख प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्याशी झाली. दोघांनी एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी फोटोशूट केलं होतं. याच फोटोशूटनंतर दोघांमधील जवळीक वाढली होती. काही मीडियारिपोर्टनुसार या दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र लग्नाच्या आधी रवी शास्त्री यांनी अमृतासमोर चित्रपटात काम न करण्याची अट ठेवली. अर्थातच अमृताला रवी शास्त्री यांची ही अट मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं.
आणखी वाचा- सारा-कार्तिक पुन्हा एकमेकांना करतायत डेट? ब्रेकअपनंतर एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
सनी देओल आणि रवी शास्त्री यांच्यानंतर अमृताच्या आयुष्यात विनोद खन्ना यांची एंट्री झाली. मात्र दोघांच्या वयात बरंच अंतर होतं. ही गोष्ट अमृताच्या आईला मान्य नव्हती त्यामुळे अमृताने अखेर विनोद खन्ना यांच्याशीही ब्रेकअप केलं. त्यानंतर अमृता सैफ अली खानला भेटली. सैफ तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान होता. अमृताला पाहताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. तीन महिने दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर कुटुंबीयांपासून लपवून लग्नही केलं. लग्नांतर अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं झाली. मात्र वैवाहिक आयुष्याच्या १३ वर्षांनंतर सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सैफने दुसरं लग्न केलं मात्र अमृता सिंगलच राहिली.