७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये सुरू झाला आहे. १९९७ साली हा सोहळा भारतात झाला होता. तब्बल २८ वर्षांनंतर ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा आज भारतात होतं आहे. या सौंदर्यवती स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व २२ वर्षांची सिनी शेट्टी करत आहे. त्यामुळे आजची रात्र भारतीयांसाठी खूप महत्त्वाची आहे. सौंदर्य, आत्मविश्वास, सादरीकरण, बुद्धिमत्ताच्या बळावर कोणती सौंदर्यवती बाजी मारून ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब मिळवते? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा सुरू झाला असून अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित राहिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली आहे. त्या या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत.
हेही वाचा – ‘पारु’ की ‘शिवा’? कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद? जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट
या स्पर्धेच्या परीक्षणसाठी १२ सदस्याचं पॅनेल आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, अमृता फडणवीस, साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचा समावेश आहे. हे सदस्य ‘मिस वर्ल्ड २०२४’चं परीक्षण करणार आहेत. ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा ‘सोनी लिव्ह इंडिया’वर लाइव्ह पाहू शकता.
दरम्यान, ‘मिस वर्ल्ड २०२४’च्या महाअंतिम सोहळ्याच सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग हे दोघं करत आहेत. तसंच शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर यांचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.