राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सध्या त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमृता यांचं ‘मूड बना लिया है’ नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या गाण्याला अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले होते. दोन आठवड्यानंतरही गाणं प्रेक्षक पसंत करत आहेत. अमृता फडणवीसदेखील गाण्याचं प्रमोशन करताना दिसत आहेत.

नुकताच अमृता फडणवीस यांनी या गाण्यावर एक व्हिडीओ बनवला आहे. या गाण्यात त्यांच्याबरोबर रियाझ अली देखील आहे. रियाझने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अमृता फडणवीसांना टॅग करत शेअर केला आहे. रियाझ अली हा सोशल मीडिया स्टार आहे. रियाझने अमृता फडणवीस यांच्याबरोबर ‘मूड बना लिया है’ या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये रियाझ एका खुर्चीवर बसून फोनवर बोलताना दिसतोय. तिथे अमृता फडणवीस येतात आणि त्याच्याबरोबर डान्स करू लागतात. अमृता यांनी ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे आणि त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट घातलंय.

अमृता फडणवीसांचा हा रील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून अमृता फडणवीसांना चांगलंच ट्रोल केलं जातंय. ‘डान्स चांगला नाही झाला’, ‘फडणवीस साहेब, हे सगळं काय चाललंय’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

amruta fadanvis 1
(फोटो – इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

‘देवेंद्र फडणवीस जी हे काय चालू आहे, हिंदुत्वाचा डंका तुम्ही वाजवता आणि मुसलमानासोबत मॅडम नाचतात’, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

amruta fadanvis 1
(फोटो – इन्स्टाग्रामवरून साभार)

अमृता यांनी याआधीही अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बँकर असलेल्या अमृता यांना गाण्याची विशेष आवड आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.

Story img Loader