Salman Khan Dance Video: मुंबईत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘बच्चे बोले मोरया’ हा विशेष उपक्रम दिव्यज फाउंडेशनकडून सुरू करण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी बीएमसी, मुंबई पोलीस आणि विद्यार्थी संसद एकत्र आले आहेत. नुकतेच या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात सलमान खान, त्याची बहीण अलविरा, कैलाश खेर आणि सोनू निगम या बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) याही या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. भावी पिढ्यांना पर्यावरण रक्षणाची जाणीव करून देण्यासाठी ‘बच्चे बोले मोरया’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यात सलमान खानने मंचावर जबरदस्त डान्स केला.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

सलमान खानचा डान्स व्हिडीओ –

सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सलमान खान ‘जलवा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी मंचावर अमृता फडणवीस सलमानचा डान्स बघताना हसताना दिसत आहेत. सलमान खानचा डान्स व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. काहींनी सलमानच्या या डान्सचं कौतुक केलं आहे, तर काहींनी सलमान खानचं वय झालं आहे, अशा कमेंट या व्हिडीओवर केल्या आहेत.

“गरोदर असताना त्याने पोटावर लाथ मारली”, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अभिनेत्याबद्दल पहिल्या पत्नीने केलेले धक्कादायक खुलासे

सलमान खानच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स

सलमानचा हा व्हिडीओ पाहून सलमान खानचं पोट सुटलंय, अशा कमेंट्सही काही युजर्सनी केल्या आहेत. ‘म्हातारा झालास, आराम कर,’ ‘असा डान्स करून तो कोणतीही स्पर्धा जिंकणार नाही,’ ‘या व्हिडीओत कुणाला सलमान खानचं वाढलेलं पोट दिसतंय का,’ ‘भाईजानचं वय झालंय,’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.

salman khan dance video comments
सलमान खानच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला होता. चित्रपटाने सरासरी कमाई केली होती. यानंतर तो ‘सिकंदर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याचा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader