राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. अमृता अनेकदा त्यांचं मतही परखडपणे मांडताना दिसतात. त्या पेशाने बॅंकर असून गायिकाही आहेत. आजवर त्यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

अमृता फडणवीसांनी अल्बममध्ये नाही तर एका चित्रपटात गाणं गायलं आहे. ‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटातील एक गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. ‘धडका दिल’ असे त्यांनी गायलेल्या गाण्याचे बोल आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवूड गायक शानसह त्यांनी हे गाणं गायलं आहे. अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून प्रेक्षकांच्याही ते पसंतीस उतरत आहे. नव्या गाण्याबाबत अमृता फडणवीसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

हेही वाचा >> “तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो?”, नीतू कपूर म्हणतात “एक कोटी…”

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

“‘लव्ह यू लोकतंत्र’ चित्रपटातील ‘ना जाने क्यू धडका दिल’ हे या वर्षातील सगळ्यात रोमॅंटिक गाणं लोकप्रिय गायक शान यांच्यासह गाताना मजा आली”, असं म्हणत अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. येत्या १४ ऑक्टोबरला ‘लव्ह यू लोकतंत्र’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा >> ‘लागिर झालं जी’ फेम नितीश चव्हाण मराठीमधील बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपटामध्ये झळकणार, लूक समोर

अमृता फडणवीसांनी याआधी बॉलिवूड गायक सोनू निगमसह अल्बमसाठी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं. सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ ही त्यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Story img Loader